देशामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच रशियामध्ये निर्मिती करण्यात आलेली स्पुटनिक व्ही लस लवकरच भारतीय बाजारपेठांमध्ये उपलब्ध होणार असल्याची माहिती गुरुवारी सरकारच्या वतीने देण्यात आली. स्पुटनिक व्ही लस पुढील आठवड्यापासून मिळणार असल्याची माहिती नीती आयोग सदस्य डॉ. वीके पॉल यांनी दिली आहे. स्पुटनिक व्ही लशीची पहिली खेप भारतात आली आहे. दुसरी खेप उद्या भारतात पोहोचणार आहे. कालच्या या घोषणेनंतर आज डॉक्टर रेड्डीज लॅबोरेट्रीच्या माध्यमातून आज या लसीचा पहिला डोस हैदराबादमध्ये दिला आहे. डॉक्टर रेड्डीज लॅबोरेट्रीने रशियन डायरेक्ट इनव्हेसमेंट फंडशी करार केला असून त्याअंतर्गत हा डोस देण्यात आला आहे. यावेळी कंपनीने लसीच्या किंमतीची घोषणा केली असून लसीचा एक डोस ९४८ रुपयांना उपलब्ध असणार आहे. त्यावर पाच टक्के जीएसटी आकारण्यात येणार असल्याने एकूण किंमत ९९५ रुपये ४० पैसे इतकी असेल असं कंपनीने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ही रशियन बनावटीची लस भारतात सरासरी हजार रुपयांना उपलब्ध होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मर्यादित संख्येत आम्ही ही लस देत असून हे लसीचं सॉफ्ट लॉन्चिंग सुरु झालं आहे. पहिली लस आज १४ मे २०२१ रोजी हैदराबादमध्ये देण्यात आली,” असं रेड्डीज लॅबोरेट्रीने जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटलं आहे. तसेच “या लसीची किंमत ९४८ रुपये आणि पाच टक्के जीएसटी इतकी असणार आहे. स्थानिक पातळीवर पुरवठा सुरु होईल तेव्हा लसीची किंमत आणखीन कमी होण्याची शक्यता आहे,” असंही रेड्डीज लॅबोरेट्रीने स्पष्ट केलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr reddy rolls out sputnik v covid 19 vaccine in india at around rs 995 per dose scsg
First published on: 14-05-2021 at 13:38 IST