IndiGo flight air hostess molests: दिल्ली-शिर्डी प्रवास करणाऱ्या इंडिगोच्या विमानात एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या प्रवाशाने विमानातील एअर होस्टेसचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. विमानातील शौचालयाजवळ सदर घटना घडली. प्रवासी शौचालयाजवळ आला असताना त्याने एअर होस्टेसला चुकीच्या पद्धतीने हात लावला. या घटनेनंतर एअर होस्टेसने तात्काळ क्रू मॅनेजरला या घटनेची माहिती दिली. क्रू मॅनेजरने विमानतळ सुरक्षा विभागाला याची तक्रार केल्यानंतर शुक्रवारी दुपारी विमान उतरताच संबंधित प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले. आरोपीविरोधात राहता पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक झाल्यानंतर वैद्यकीय चाचणी केली असता प्रवासी मद्याच्या अमलाखाली होता, हे स्पष्ट झाले आहे. यानंतर राहता पोलिसांनी त्याला नोटीस बजावली.

गेल्या काही काळापासून विमानात गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. २०१७ मध्ये मुंबई – नेवार्क फ्लाईटमधील बिझनेस क्लासचा प्रवासी गणेश पारकर इकॉनॉमी क्लासच्या रिकाम्या सीटवर महिलेच्या शेजारी जाऊन बसला होता. सदर महिला झोपेत असताना पारकरने तिला स्पर्श केला. यानंतर पीडित महिला विमानात एका कोपऱ्यात एकटीच रडत असल्याचे क्रू सदस्यांच्या लक्षात आले. यानंतर पारकरने संबंधित महिलेला दोन हस्तलिखित नोट दिल्या. यात लिहिले होते की, माझ्याकडून क्षणिक मूर्खपणा झाला. तसेच दुसऱ्या एका चिठ्ठीत लिहिले होते की, मी मूर्ख आहे, हे मान्य करतो.

नोव्हेंबर २०२४ मध्ये, शंकर मिश्रा या प्रवाशाने मद्यधुंद अवस्थेत एअर इंडियाच्या बिझनेस क्लासमध्ये एका वृद्ध महिलेच्या अंगावर लघूशंका केली. या घटनेनंतर शंकर मिश्रा नोकीर करत असलेल्या नामांकित कंपनीतून त्यांन डच्चू देण्यात आला. या घटनेनंतर शंकर मिश्राच्या वडिलांनी दावा केला की, तडकाफडकी नोकरीवरून काढून टाकण्यात आल्यामुळे मुलाला २०० हून अधिक ठिकाणी नोकरी नाकारण्यात आली. त्याच्या कंपनीने त्याला घाईघाईने कामावरून काढून टाकले, त्यांनी योग्य प्रक्रियेचा अवलंब केला नाही, अशी टीका त्यांनी केली.

२०२५ मध्ये, दिल्ली-बँकॉक एअर इंडियाच्या विमानातही अशीच एक घटना घडली होती. याही विमानात एका मद्यधुंद भारतीय प्रवाशाने सहप्रवाशावर लघवी केली होती. या घटनेनंतर विमान कंपनी आणि सरकारने या प्रकरांची गंभीर दखल घेत विमानात होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसविण्याचा प्रयत्न केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय, सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशांनी सुनावणीदरम्यान विमानातील त्रासदायक अनुभवांचा किस्सा सांगितला. न्या. के. व्ही. विश्वनाथन म्हणाले, एका मद्यधुंद सहप्रवाशाने विमानाच्या शौचालयात स्वतःला कोंडून घेतले होते आणि तिथेच तो अर्धा तास झोपला. केबिन क्रू सदस्यांना याबाबत वारंवार सांगूनही त्यांनी मास्टर कीने दरवाजा उघडण्यास दिरंगाई केली.