scorecardresearch

Premium

“कॅनडात संघटित गुन्हेगारी, फुटीरतावादी शक्ती, हिंसाचार आणि…”, भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांचा हल्लाबोल

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी कॅनडामधील संघटित गुन्हेगारी, फुटीरतावादी शक्ती, हिंसाचार आणि अतिरेकी यावर भाष्य केलं.

S Jaishankar Canada Trudeau
भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी "कॅनडात संघटित गुन्हेगारी, फुटीरतावादी शक्ती, हिंसाचार" होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

सध्या भारत-कॅनडामध्ये तणावपूर्ण स्थिती आहे. अशातच भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी कॅनडामधील संघटित गुन्हेगारी, फुटीरतावादी शक्ती, हिंसाचार आणि अतिरेकी यावर भाष्य केलं. तसेच राजकीय कारणांमुळे या सर्व गोष्टींवर त्यांनी चिंताही व्यक्त केली. ते न्यू यॉर्कमध्ये ‘परराष्ट्र संबंधावरील परिषदेत’ बोलत होते.

जयशंकर म्हणाले, “मागील काही वर्षात कॅनडात अनेक संघटित गुन्हे घडले. फुटीरतावादी शक्तींकडून संघटित गुन्हे आणि हिंसाचार झाला. हे सर्व एकमेकांमध्ये फार मिसळून गेलेलं आहे. त्यामुळेच आम्ही तपशील आणि माहितीवर बोलत आहोत.”

sharad pawar
महिला आरक्षण देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य; पंतप्रधानांचे वक्तव्य चुकीचे, शरद पवार यांचे प्रतिपादन
nia
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून कॅनडाशी संबंधित ४३ गँगस्टर्स आणि दहशतवाद्यांचा तपशील जारी
india rejects canada allegations in hardeep singh nijjar murder case
“निरर्थक हेत्वारोप”, भारतानं कॅनडाला ठणकावलं; निज्जर हत्या प्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचं निवेदन जारी!
Supriya SUle on devendra Fadnavis
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरून सुप्रिया सुळेंचं ट्वीट, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना टॅग करून म्हणाल्या…

“भारताने मोठ्या संख्येने प्रत्यार्पणाची विनंती केली”

“भारत सरकारने कॅनडाला मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांची आणि तेथून बाहेर देशात गुन्हे करणाऱ्या नेत्यांची माहिती दिली आहे. भारताने मोठ्या संख्येने प्रत्यार्पणाची विनंती केली आहे,” असंही जयशंकर यांनी नमूद केलं.

हेही वाचा : ‘फाइव्ह आइज’ कराराअंतर्गत अमेरिकेकडूनच कॅनडाला निज्जर हत्येचे धागेदोरे? काय आहे हा करार?

“कॅनडात दहशतवाद्यांचे नेते”

यावेळी जयशंकर यांनी कॅनडात दहशतवाद्यांचे नेते असल्याचं स्पष्ट झालं आहे, असाही आरोप केला. त्यांनी कॅनडात भारतीय राजदूत आणि दुतावासावर होत असलेल्या हल्ल्यावरही चिंता व्यक्त केली. तसेच लोकशाही अशाचप्रकारे चालते असं म्हणून याचं समर्थनही केलं जात आहे, असा आरोप केला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Eam jaishankar allegations of organised crime violence extremism in canada pbs

First published on: 27-09-2023 at 09:05 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×