गेल्या काही दिवसांपासून जगभरात भूकंपाचे धक्के बसत आहेत. टर्की, चीन, नेपाळ, ताजिकिस्ताननंतर आता अफागाणिस्तान आणि पाकिस्तानमध्येही भूकंपाचा धक्का बसला आहे. या भूकंपाची तीव्रता ६.६ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली असून या घटनेत पाकिस्तानातील नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १०० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे अफगाणिस्तानमध्येह काही दिवसांपूर्वीच भूकंपाचा धक्का बसला होता.

हेही वाचा – अमृतपालला अटक करण्यात अपयश का? उच्च न्यायालयाने पंजाब सरकारला फटकारले

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, रात्री १०.३० च्या सुमारास अफगाणिस्तानच्या हिंदूकुश क्षेत्रात ६.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या भूंकपाचे झटके पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वासह उत्तर भारतातही जाणवले. या भूंकपाचे केंद्र अफगाणिस्तानच्या जुर्म भागात होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या घटनेत पाकिस्तानातील नऊ नागरिकांचा मृत्यू झाला असून १०० पेक्षा जण जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पाकिस्तानच्या आपत्कालीन सेवांचे प्रवक्ते बिलाल फैझी यांनी दिली.