Earthquake : अर्जेंटिना आणि चिली या दोन्ही देशांची जमीन भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरली आहे. ७.४ रिश्टर स्केलच्या तीव्रतेच्या भूकंपाचे हादरे अर्जेंटिना आणि चिलीत बसल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी अर्जेंटिना आणि चिलीच्या दक्षिण किनाऱ्यांना ७.४ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला आहे. यानंतर तेथे त्सुनामीचा इशारा देण्यात आला असल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, भूकंपाची तीव्रता लक्षात घेता त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. भूकंपाच्या तीव्र धक्क्यांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. लोक घराच्या बाहेर पडून मोकळ्या जागेत जात आहेत. या संदर्भातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षण (USGS) नुसार भूकंपाचे केंद्र अर्जेंटिनाच्या उशुआइया (Ushuaia) या शहरापासून सुमारे २१९ किलोमीटर दक्षिणेस समुद्राखाली होते. त्यामुळे त्सुनामीचा धोका असल्यामुळे चिलीच्या प्रशासनाने देशाच्या दक्षिणेकडच्या संपूर्ण किनारपट्टीच्या भागात त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. तेथील लोकांना तात्पुरता स्थलांतराचा अलर्ट देण्यात आला आहे. भूकंपाच्या तीव्र धक्क्यांमुळे तेथील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
Evacuation to higher ground due to possible tsunami in Punta Arenas, Patagonia, Chile pic.twitter.com/2GXSzVio2O
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— Disasters Daily (@DisastersAndI) May 2, 2025
युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, दक्षिण अर्जेंटिनामधील उशुआइयाच्या ड्रेक पॅसेजमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपानंतर लगेचच त्सुनामीचा इशारा देण्यात आला. त्यानंतर स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी लोकांना किनाऱ्यापासून दूर जाऊन सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे. अर्जेंटिना व्यतिरिक्त चिलीचे काही भाग देखील त्याच्या कक्षेत येतात. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ समोर आले ज्यामध्ये त्सुनामीचा इशारा देणारे सायरन वाजताना आणि स्थानिक लोक सुरक्षित ठिकाणी जाताना दिसत आहेत.