पंजाब नॅशनल बँक (PNB) घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी, त्यांची पत्नी प्रीती आणि इतरांविरुद्ध नवीन आरोपपत्र दाखल केले आहे. प्रीतीविरोधात ईडीने ही पहिली तक्रार दाखल केली आहे.

२०१७ पासून प्रीती फरार
एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार या पीएनबी घोटाळ्यात प्रीती यांनी आपले पती मेहुल चोक्सी यांनी मदत केली असल्याचा आरोप ईडीने केला आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत ईडीने मार्चमध्ये मुंबईतील विशेष न्यायालयात हे आरोपपत्र सादर केले होते. या आरोपपत्रात ईडीने मेहुल चोक्सीची पत्नी प्रीती चोक्सी हिचे नाव १३,००० कोटी रुपयांच्या पीएनबी बँक घोटाळ्यातील लाभार्थी असल्याचे ईडीचे म्हणणे आहे. तसेच २०१७ पासून ती देखील फरार असून आपल्या पतीसह दुसऱ्या देशात लपून बसल्याचा दावा ईडीने केला आहे.


चोक्सी दाम्पत्याव्यतिरिक्त ईडीने त्यांच्या तीन कंपन्यांची नावे दिली आहेत. ज्यात गीतांजली जेम्स लिमिटेड, गिली इंडिया लिमिटेड, नक्षत्र ब्रँड लिमिटेड कंपन्यांचा सामावेश आहे. तसेच गोकुलनाथ शेट्टी, पीएनबीच्या मुंबईतील ब्रँडी हाऊस शाखेचे निवृत्त उपव्यवस्थापक नीरव मोदी या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.


मेहुल चोक्सीवर हे तिसरे आरोपपत्र
पीएनबी बँक घोटाळ्याप्रकरणी मेहुल चोक्सीविरोधातील हे तिसरे आरोपपत्र आहे. पहिले आरोपपत्र २०१८ मध्ये आणि दुसरे २०२० मध्ये दाखल करण्यात आले. या घोटाळ्यातील प्रीती चोक्सीच्या भूमिकेची ईडी अनेक दिवसांपासून चौकशी करत आहे. नवीन आरोपपत्रानुसार, प्रीती चोक्सी हिला प्रीती प्रद्योतकुमार कोठारी या नावानेही ओळखले जाते, हिलिंग्डन होल्डिंग्ज लिमिटेड आणि चेरिंग क्रॉस होल्डिंग्ज लिमिटेड या युएईमधील ३ कंपन्यांच्या प्रीती मालक होत्या.