युक्रेनवरील रशियन आक्रमणाचा थेट परिणाम खाद्यतेलाच्या किमतीवर होणार आहे. विशेषत: सूर्यफूल तेल, व्यापारी आणि सॉल्व्हेंट उत्पादकांनी हा इशारा दिला आहे. पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे किमती वाढत जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

पूर्वीच्या सोव्हिएत प्रजासत्ताकाकडून भारत कच्चं सूर्यफूल तेल आयात करत होता.नोव्हेंबर-ऑक्टोबर (तेल पुरवठा वर्ष) २०२०-२१ साठी भारताने एकूण १८.९३ लाख टन कच्चं सूर्यफूल तेल आयात केलं होतं. यापैकी १३.९७ लाख टन एकट्या युक्रेनमधून होते. अर्जेंटिना (२.२४ लाख टन) आणि रशिया (२.२२ लाख टन) हे इतर प्रमुख पुरवठादार आहेत परंतु आकडेवारीनुसार युक्रेन हा भारताला एकमेव प्रमुख पुरवठादार आहे.

हेही वाचा – Russia-Ukraine War Live: युक्रेनने रशियाशी राजनैतिक संबंध तोडले; राष्ट्राध्यक्ष ट्वीट करत म्हणाले, “नाझी जर्मनीप्रमाणे आपल्यावर…”


खाद्यतेल उत्पादकांची सर्वोच्च संस्था मानल्या जाणाऱ्या सॉल्व्हेंट अँड एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन (SEA) चे अध्यक्ष अतुल चतुर्वेदी म्हणाले की किमती वाढत जाण्याची अपेक्षा आहे. सूर्यफूल तेल युक्रेन आणि रशियामधून येते आणि त्याची पुरवठा साखळी विस्कळीत होईल. आम्ही दरमहा सुमारे २ लाख मेट्रिक टन सूर्यफूल तेल आयात करतो,” चतुर्वेदी म्हणाले. हे युद्ध अशा वेळी आले आहे जेव्हा देशांतर्गत बाजारपेठेत खाद्यतेलाची चलनवाढ ही मोठी चिंता आहे.केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या किंमत निरीक्षण कक्षानुसार किरकोळ बाजारात रिफाइंड सूर्यफूल तेलाची किंमत १४५.३ प्रतिलीटरच्या तुलनेत .१६१.९४ रुपये प्रतिलीटरपर्यंत वाढली आहे. पुरवठा साखळीतील व्यत्ययामुळे किमतीत लक्षणीय वाढ होऊ शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.


चतुर्वेदी म्हणाले की, अर्जेंटिना हा पर्यायी पुरवठादार असू शकतो, परंतु देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली गुणवत्ता या दक्षिण अमेरिकी देशाकडून पूर्ण होऊ शकत नाही. किरकोळ अन्नधान्य महागाई ही देशातील एक मोठी समस्या बनली आहे आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ग्राहक व्यवहार मंत्रालयाने अनेक पावले उचलल्याचं पाहिलं आहे.या युद्धाचा आणखी एक परिणाम म्हणजे देशातील घाऊक बाजारात सोयाबीनच्या सरासरी खरेदी-विक्रीच्या किमतीत अचानक झालेली वाढ. महाराष्ट्रातील लातूरच्या घाऊक बाजारात ६,२०० रुपये प्रतिक्विंटल भाव असलेले भाव गेल्या दोन दिवसांपासून ७,००० रुपये प्रति क्विंटलच्या पुढे गेले आहेत