scorecardresearch

Premium

गांधी यांना निवडणूक आयोगाची नोटीस; पंतप्रधानांबाबत आक्षेपार्ह टीका केल्याने दोन दिवसांत उत्तर देण्याचे आदेश

राजस्थान आणि मध्य प्रदेशमधील निवडणूक प्रचारसभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख ‘पनवती’, ‘खिसेकापू’ असा उल्लेख केल्याने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.

narendra modi and rahul gandhi 13
गांधी यांना निवडणूक आयोगाची नोटीस; पंतप्रधानांबाबत आक्षेपार्ह टीका केल्याने दोन दिवसांत उत्तर देण्याचे आदेश

पीटीआय, नवी दिल्ली

राजस्थान आणि मध्य प्रदेशमधील निवडणूक प्रचारसभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख ‘पनवती’, ‘खिसेकापू’ असा उल्लेख केल्याने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. शनिवारी संध्याकाळपर्यंत या नोटिशीला उत्तर देण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.

indi Alliance
“इंडिया आघाडीत फूट पडलेली नाही”; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा दावा! भाजपा फूट पाडत असल्याचाही गंभीर आरोप
Samajwadi Party proposal for 11 seats It is claimed that the seat sharing with the congress
‘सप’चा ११ जागांचा प्रस्ताव; काँग्रेसबरोबर जागावाटपाला चांगली सुरुवात झाल्याचा दावा
karnatak
कर्नाटक काँग्रेसला मोठा झटका; जगदीश शेट्टर यांची भाजपामध्ये ‘घर वापसी’, नेमकं कारण काय?
Assam Chief Minister Himanta Biswa Sarma and Congress MP Rahul Gandhi
‘राहुल गांधींना आताच अटक करा’, काँग्रेस नेत्याची मागणी; हिमंता सर्मा म्हणाले, “निवडणुकीत ते आम्हाला हवेत…”

राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याने भाजपने त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. एका ज्येष्ठ नेत्याने अशा प्रकारची भाषा वापरणे अशोभनीय आहे, असे या तक्रारीत म्हटले होते. या तक्रारीची दखल घेऊन निवडणूक आयोगाने गांधी यांना नोटीस पाठवली. ‘आदर्श आचारसंहिता नेत्यांना आपल्या प्रतिस्पध्र्यावर असत्यापित आरोप करण्यात मनाई करते,’ असे या नोटिशीत म्हटले आहे.

हेही वाचा >>>काँग्रेसकडून गुर्जरांचा अपमान! पंतप्रधान मोदींचा आरोप

‘आरोप तथ्यहीन’

राजस्थानमधील बायतू येथील प्रचारसभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘पनवती’ असे संबोधून टीका केली होती. त्याशिवाय पंतप्रधानांनी ‘अतिश्रीमंतांना कर्जमाफी केली’ अशीही टीका करण्यात आली होती. राहुल गांधी यांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचे भाजपने सांगितले. निवडणूक आयोगाला दिलेल्या निवेदनात त्यांनी ठासून सांगितले की, गेल्या नऊ वर्षांत उद्योगपतींना १४ लाख कोटी रुपयांची कर्जमाफी दिल्याचा आरोप तथ्यांवर आधारित नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Election commission notice to rahul gandhi for criticizing narendra modi amy

First published on: 24-11-2023 at 03:58 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×