Elon Musk to Pakistani Man: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले एलॉन मस्क हे सोशल मीडियावर बेधडक व्यक्त होताना अनेकदा दिसतात. आता सोशल मीडियावर त्यांनी एका व्यक्तीच्या व्हायरल व्हिडीओवर व्यक्त केलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे. डेन्मार्कमध्ये पाकिस्तानी आणि डॅनिश व्यक्तीमध्ये भांडण सुरू असल्याचा एक व्हिडीओ एक्सवर पोस्ट करण्यात आला होता. पाकिस्तानी व्यक्ती म्हणतो की, पुढच्या १० ते १५ वर्षांत पाकिस्तानी लोकांची संख्या डॅनिश नागरिकांपेक्षाही अधिक होईल. या व्हिडीओवर मस्क यांनी दिलेली प्रतिक्रिया लक्षवेधी ठरत आहे.
पाकिस्तानी नागरिकाने काय धमकी दिली?
या व्हिडीओत पाकिस्तानी व्यक्ती म्हणतो, “आम्हाला पाच मुले होतात, तुम्हाला फक्त १-२ मुले होतात. पुढच्या १० ते १५ वर्षांत पाकिस्तानी नागरिकांची संख्या डॅनिश लोकांपेक्षा अधिक होईल. डेन्मार्कमध्ये डॅनिश लोकांची संख्या फक्त ५० लाख आहे. तर आम्ही कोट्यवधी संख्येत होणार आहोत.”
पाकिस्तानी व्यक्ती पुढे म्हणतो, “मी लग्न केले आहे. आता मी ५ मुलांना जन्म घालणार. तुम्ही जाऊन मुलांना जन्म घाला.” या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना पाकिस्तानी व्यक्तीने सांगितले की, या माणसाचे गणित एकदम बरोबर आहे.
लोकसंख्येबाबत मस्क यांचा इशारा
एलॉन मस्क यांनी अनेकदा घटणाऱ्या लोकसंख्येवर विधान केलेले आहे. जगाची लोकसंख्या वाढत नसून ती घटत आहे, असे ते म्हणाले होते. जर लोकसंख्या कमी होत गेली तर त्याचा थेट परिणाम अर्थव्यवस्था, रोजगार आणि समाजावर होईल. मस्क म्हणाले, अधिकतर लोकांना वाटते की, जगाची लोकसंख्या वाढलेली आहे. मात्र सत्यता याउलट आहे.