उत्तराखंडच्या उत्तरकाशी येथील बांधकाम सुरू असलेल्या सिल्क्यारा बोगद्यामध्ये सात दिवसांपासून ४० मजूर अडकले आहे. त्यांच्या सुटकेसाठी रात्रंदिवस प्रयत्न केले जात आहेत. त्यातच बोगद्याचं काम करणाऱ्या कंपनीनं केलेली चूक दर्शवणारा एक नकाशा समोर आला आहे.
स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ( एसओपी ) नुसार तीन किलोमीटरपेक्षा अधिक लांबीच्या बोगद्यात आपत्तीच्या वेळी लोकांना आपत्कालीन सुटकेचा मार्ग असावा. ४.५ किलोमीटर लांबीच्या सिल्क्यारा बोगद्यातील आपत्कालीन मार्ग तयार करण्यात येणार होता. पण, हा मार्ग तयार करण्यात आला नसल्याचं समोर आलं आहे.
हेही वाचा : उत्तराखंड : पाचव्या दिवशीही कामगार बोगद्यात अडकलेलेच, बचावकार्यासाठी नॉर्वे अन् थायलंडची मदत
गुरूवारी केंद्रीय मंत्री व्ही. के सिंह यांनी बोगद्याच्या ठिकाणी भेट दिली. त्यानंतर हा नकाशा समोर आला आहे. दोन ते तीन दिवसांत मजुरांची सुटक होईल, असा विश्वास व्ही. के सिंह यांनी व्यक्त केला होता.
हेही वाचा : मजुरांच्या सुटकेसाठी शक्तिशाली यंत्राच्या साहाय्याने खोदकाम
शुक्रवारी अमेरिकन ड्रिलच्या माध्यमातून ढिगारा हटवण्याचं काम सुरू होतं. पण, अचानक बोगद्यातून मोठा आवाज आल्यानं काम थांबवण्यात आलं आहे. यामुळे बोगद्यात अडकलेल्या ४० मजुरांचे कुटुंबीय चिंतेत आहेत. बोगद्यात काम करत असलेल्या कर्मचाऱ्यानं सांगितलं की, आपत्कालीन मार्ग तयार झाला असता, तर मजुरांना वाचवता आलं असतं. ‘एनडीटीव्ही’नं हे वृत्त दिलं आहे.