मतदान यंत्रात (EVM) फेरफार केला जाऊ शकतो किंवा नाही, यावर देशभरात चर्चेचे वादळ उठले आहे. याबाबत दिल्ली विधानसभेतही आम आदमी पक्षातर्फे ईव्हीएमचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले होते. त्यावर आता निवडणूक आयोगाने ईव्हीएममध्ये फेरफार अशक्यच आहे, असे म्हटले आहे. ईव्हीएममध्ये फेरफार करून दाखवाच, असे आव्हान निवडणूक आयोग उद्या, शनिवारी आरोप करणाऱ्यांना देणार आहे. त्याच्या तारखांचीही घोषणा केली जाणार आहे. ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी (VVPAT) मशीनचे काम नेमके कसे चालते, याचे प्रात्यक्षिकही निवडणूक आयोग पत्रकार परिषदेत दाखवणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशातील पाच राज्यांत नुकत्याच निवडणुका पार पडल्या. निकालानंतर आम आदमी पक्ष आणि काँग्रेससह विरोधी पक्षांनी ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा आरोप केला होता. विशेष कोडमार्फत ईव्हीएममध्ये फेरफार केला जाऊ शकतो, याचे प्रात्यक्षिकही ‘आप’ने दिल्ली विधानसभेत दाखवले होते. आपने केलेले आरोप चुकीचे आहेत, असे निवडणूक आयोगाने म्हटले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना खुले आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. ईव्हीएममध्ये फेरफार अशक्य असल्याचे सिद्ध करणे हा यामागील उद्देश आहे. आगामी निवडणुकांमध्ये व्हीव्हीपीएटीचाही वापर करण्यात येणार आहे. आपण कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान केले आहे, हे मतदान पावतीद्वारे मतदाराला कळणार आहे. सर्वपक्षीयांसोबत बैठक घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने ही घोषणा केली होती. या बैठकीत अनेक राजकीय पक्षांनी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्यात यावे, असे सूचविले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Evm vvpat machines how do work election commission demonstrate tomorrow
First published on: 19-05-2017 at 19:05 IST