आम आदमी पक्षाची मान्यता रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी माजी सरकारी अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहले आहे. त्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही कारवाई करावी, असं म्हटलं आहे. गुजरातमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना आम आदमी पक्षासाठी काम करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप माजी सरकारी अधिकाऱ्यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुरुवारी ( १५ सप्टेंबर ) ५६ माजी अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाला हे पत्र लिहलं आहे. याबाबत कर्नाटकचे माजी अधिकारी एम मदन गोपाल यांनी सांगितलं की, “दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वाहतूक महामंडळाचे चालक, वाहक आणि पोलीस कर्मचाऱ्यांना विशिष्ट पक्षासाठी काम करण्याचे प्रवृत्त करणे चुकीचं आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी राजकीय पक्षासाठी प्रचाराचे काम करणे अपेक्षित नाही. सरकारी अधिकाऱ्यांची आचारसंहिता असून, त्यांची निष्ठा भारतीय राज्यघटनेशी आहे.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ex bureaucrats write letter election commission seek de recognitison of aap and action against cm arvind kejriwal ssa
First published on: 16-09-2022 at 11:22 IST