आपल्या देशात जनमतात सामान्यत: राजकीय नेत्यांच्याबाबतीत मते चांगली नसतात कारण, तशी मते निर्माण होण्याची कारणेही नेत्यांनीच निर्माण करून ठेवलेली असतात असा जनमानसाचा  समज दिसून येतो. त्यातून सोशल नेटवर्कींच्या महाजालात नेत्यांवर अनेक विनोदी टीकाही होतात आणि त्याचे हॅशटॅगही चक्क ट्रेंडींगमध्ये झळकू लागतात.  देशातील सध्याच्या महत्वाच्या राजकीय व्यक्ती राजकारणात नसत्या, तर ते आज कोण असते? यावरून विनोदी ट्विट्स होत आहेत.
एका ट्विटरकराने मनमोहन सिंग यांनी ‘गोलमाल’ या चित्रपट मालिकांमध्ये अभिनेता तुषार कपूर याचे संवाद मुद्रीत करण्याचे काम चांगले केले असते. असे विनोदीवृत्तीतून म्हटले आहे (मूळात चित्रपटात तुषार कपूर मुक्याच्या भूमिकेत आहे). त्यानंतर एकाने राहुल गांधी हे तर जापानमधील ‘टेकशी कॅसेल’ या स्पर्धात्मक कार्यक्रमातील स्पर्धक असते असे म्हटले, तर कोणी मुलायमसिंह यादव हे नासामध्ये ‘एलियन्स’ने पाठविलेले सांकेतिक संदेश सोडविणाऱयांचे प्रमुख असते असेही म्हटले आहे.
ट्विटरकरांनी केलेले आठ विनोद-