एपी, तेल अवीव : इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी रविवारी त्यांच्या मंत्रिमंडळातील एका प्रमुख मंत्र्याला पदावरून दूर केले. या मंत्र्याला पदावरून हटवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.  यामुळे न्यायालयाच्या अधिकारांबाबतचे मतभेद आणखी तीव्र झाले आहेत.

 नेतान्याहू यांनी अंतर्गत व आरोग्यमंत्री आर्येश देरी यांना हटवल्याचे पंतप्रधानांच्या कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे. गेल्या वर्षी करविषयक गुन्ह्यांमध्ये दोषी ठरविल्यामुळे देरी हे पदावर राहू शकत नाहीत, असा निर्णय न्यायालयाने दिला होता. देरी यांना हटवण्याचा निर्णय नेतान्याहू यांनी मंत्रिमंडळाच्या एका बैठकीत जाहीर केला.

Loksatta chavdi happening in maharashtra politic news on maharashtra politics
चावडी: तो मी नव्हेच!
CM Mamata Banerjee On Attack NIA team
‘एनआयए’च्या पथकावर जमावाचा हल्ला, ममता बॅनर्जी यांनी तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनाच सुनावले, म्हणाल्या, “मध्यरात्री लोकांच्या घरात…”
Sunita Kejriwal
‘आप’च्या ५५ आमदारांनी घेतली सुनीता केजरीवालांची भेट; मुख्यमंत्रीपदाबाबत दिला महत्त्वाचा सल्ला, म्हणाले…
Supreme Court Gyanvapi mosque
ज्ञानवापीच्या तळघरातील पूजेवर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; मुस्लीम पक्षकारांची याचिका फेटाळली

न्यायपालिकेच्या अधिकारांबाबत इस्रायलमध्ये सध्या वाद सुरू असतानाच न्यायालयाचा हा निकाल आला आहे. नेतान्याहू यांचे अतिउजव्या विचारांचे सरकार सर्वोच्च न्यायालयाला कमजोर करू इच्छिते आणि राजकीय नेत्यांना अधिक अधिकार देऊ इच्छिते. यामुळे देशातील ‘नियंत्रण व संतुलनाची’ (चेक्स अँड बॅलन्सेस) यंत्रणा संपुष्टात येईल आणि इस्रायलच्या लोकशाहीची मूलभूत तत्त्वे धोक्यात येतील, असे टीकाकारांचे म्हणणे आहे.

परिणाम काय?

आर्येश देरी यांना मंत्रीपदावरून दूर केल्याने नेतान्याहू यांच्या नेतृत्वाखालील सतारुढ आघाडीचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. या आघाडीत टोकाचे राष्ट्रवादी तसेच सनातनी विचारांचे पक्ष समाविष्ट आहेत. यात देरी यांच्या शास या पक्षाचा समावेश असून तो सत्ताधारी आघाडीतील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष आहे.