जगातील सर्वात मोठे सोशल नेटवर्किंग ऑनलाइन व्यासपीठ असलेल्या फेसबुकचे संकेतस्थळ गुरुवारी सकाळी सुमारे अर्धा तास बंद पडले होते. संकेतस्थळातील तांत्रिक अडचणींमुळे भारतासह जगभरातील १.२ अब्ज वापरकर्त्यांना सकाळी फेसबुक वापरता आले नाही.
मार्क झुकेरबर्गला इराणच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
‘गुड मॉर्निग’चे संदेश पोस्ट करण्यासाठी वापरकर्त्यांनी गुरुवारी सकाळी फेसबुकचे संकेतस्थळ चालू केले असता, ‘काही तरी चुकले आहे. आम्ही त्यावर काम करत असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल’ (समथिंग वेन्ट राँग, वुई आर वर्किंग ऑन गेटिंग धिस फिक्सड अॅज सून अॅज वुई कॅन) असा संदेश त्यांना पाहायला मिळाला. त्यामुळे वापरकर्त्यांची निराशा झाली. अध्र्या तासानंतर सेवा पूर्ववत झाली. ‘काही तांत्रिक त्रुटींमुळे वापरकर्त्यांना संकेतस्थळ वापरता आले नाही, याबद्दल आम्ही दिलगीर आहोत,’ असे फेसबुकच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
फेसबुक बंद पडल्याचा राग नेटिझन्सनी ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग वेबसाइटवरून व्यक्त केला. भारतात तर ‘k#facebookdownl’ हा विषय ट्विटरवर सर्वाधिक चर्चिला गेला.
संग्रहित लेख, दिनांक 20th Jun 2014 रोजी प्रकाशित
फेसबुकचे ‘काही तरी चुकले’!
जगातील सर्वात मोठे सोशल नेटवर्किंग ऑनलाइन व्यासपीठ असलेल्या फेसबुकचे संकेतस्थळ गुरुवारी सकाळी सुमारे अर्धा तास बंद पडले होते.
First published on: 20-06-2014 at 04:38 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Facebook site had technical problems