केंद्रीय मंत्री फारूक अब्दुल्ला यांनी महिलांबाबत केलेल्या खळबळजनक वक्तव्यानंतर काहीच तासांमध्ये माफी मागितली आहे. ‘सध्या परिस्थिती अशी आहे कि, पुरूषांना महिलांशी बोलायलाही भिती वाटते. किंवा एखादी महिला सेक्रेटरी ठेवायची सुध्दा सोय राहिलेली नाही. कोण जाणे त्यांच्यावरही कारागृहात जाण्याची वेळ येईल’, असं फारूक अब्दुल्ला म्हणाले होते.
अब्दुल्ला यांच्या या विधानानंतर फारूक अब्दुल्ला यांचे पुत्र आणि जम्मू-कश्मीर चे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी टि्वटरवरून ‘मला पूर्ण खात्री आहे कि, महिलांच्या सुरक्षिततेबाबतचा हा विषय हसण्यावारी नेण्याचा त्यांचा प्रयत्न नव्हता, त्यामुळे अनवधानानाने झालेल्या त्यांच्या या वक्तव्याबाबत ते माफी मागतील अशी मला आशा आहे.’, असे ट्विट केले होते.



त्यानंतर लोकसभेतून बाहेर पडताच क्षणी फारूक अब्दुल्ला यांनी, ‘माझे असे काहीही म्हणणे नव्हते, परंतू त्या विधानाचा चुकीचा अर्थ निघाला असल्यास मी त्याबद्दल क्षमा मागतो’, असं ते म्हणाले.