कोर्ट मॅरेज करण्यासाठी एक मुलगी घरातून बाहेर पडली, त्यावेळी तिच्या वडिलांनी आणि भावाने तिला जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दुसऱ्या जातीच्या मुलाशी लग्न करायला चालली म्हणून या मुलीला जिवंत जाळण्यात आले. भाजपशासित मध्यप्रदेशात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत या मुलीचा जागीच मृत्यू झाला. मध्यप्रदेशातील भोपाळपासून २५० किमी अंतरावर असलेल्या खंडवा जिल्ह्यात ही अंगावर काटे आणणरी घटना घडल्याचे समजते आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्रकरणी या मुलीचे वडिल सुरेंद्रलाल यादव आणि भाऊ राजेंद्र यादव या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या मुलीला जिवंत जाळण्यात आले तिचे एका मुलावर गेल्या काही महिन्यांपासून प्रेम जडले होते. ही गोष्ट जेव्हा मुलीच्या घरातल्यांना समजली तेव्हा त्यांनी या गोष्टीला विरोध केला. मात्र मुलीने हा विरोध झुगारून लावत लग्न करेन तर याच मुलाशी अशी ठाम भूमिका घेतली. तसेच दोघांनी कोर्टात जाऊन लग्न करण्याचाही निर्णय घेतला. त्यानंतर आधी ठरल्याप्रमाणे जेव्हा ही मुलगी कोर्ट मॅरेज करण्यासाठी बाहेर पडली तेव्हा तिच्या वडिलांनी आणि भावाने तिला जिवंत जाळले. या घटनेत या मुलीचा जागीच मृत्यू झाला.

या मुलीचे वय १९ वर्षे होते. ही मुलगी तिच्या घराशेजारीच राहणाऱ्या मुलावर प्रेम करत होती. मात्र तो खालच्या जातीचा असल्याने या दोघांच्या प्रेमाला आणि लग्नाला मुलीच्या घरातल्यांनी विरोध केला. मात्र हा सगळा विरोध झुगारून या मुलीने आणि त्या मुलाने कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला. ठरल्याप्रमाणे ही मुलगी जेव्हा कोर्टात निघाली होती तेव्हा तिच्या वडिलांनी तिच्या अंगावर रॉकेल ओतले आणि तिला पेटवून दिले. यामध्ये वडिलांना मुलीच्या भावानेही मदत केली. अचानक घडलेल्या या घटनेनंतर ही मुलगी जोरजोरात ओरडू लागली. मुलीचा आवाज ऐकून लोकही जमा झाले, मात्र तोपर्यंत खूपच उशीर झाला होता कारण या आगीत मुलगी गंभीररित्या भाजली. त्यातच तिचा अंत झाला अशी माहिती पोलीस अधिकारी कैलाश पानसे यांनी दिली. पोलिसांनी या मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून वडिल आणि भावाला अटक केली आहे.

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Father and brother burns alive girl on going to court marriage
First published on: 21-07-2018 at 12:29 IST