केंद्र सरकारने २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरात वाढ करत कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर दिली आहे. आता कर्मचारी भविष्य निधीवर (ईपीएफ) चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के इतके व्याज मिळणार आहे. याचा फायदा तब्बल ६ कोटी कर्मचाऱ्यांना होणार आहे. ‘ईपीएफओ’ने घेतलेल्या निर्णयाला केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आज हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे आता पीएफवर ८.६५ टक्के इतके व्याज मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या आर्थिक वर्षामध्ये भविष्य निर्वाह निधीवर ८.५५ टक्के व्याजदर होते आता २०१८-१९ मध्ये ०.१० टक्के वाढवून ८.६५ टक्के करण्यात आला आहे. व्याजदर वाढीबाबतचा प्रस्ताव कर्मचारी भविष्य निधी संगठनाने (ईपीएफओ) पाठवला होता. त्या प्रस्तावाला अर्थ मंत्रालयाने मंजूरी दिली आहे. त्यामुळे चांगले व्याज मिळणार आहे. गेल्या तीन वर्षांतील ही पहिली व्याजदरवाढ ठरली आहे.

२०१५-२०१६ या आर्थिक वर्षात ८.८ टक्के इतका व्याजदर होता. तो २०१६-२०१७ मध्ये ८.६५ टक्क्यांवर आणण्यात आला. २०१७-१८ मध्ये तो कमी करण्यात आला. तो ८.५५ टक्के कमी करण्यात आला. आता पुन्हा यात वाढ करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Finance ministry ratifies 8 65 interest on epf for 2018
First published on: 27-04-2019 at 17:52 IST