कोलकाताला जाणाऱ्या MVSSL या मालवाहू जहाजाला भीषण आग लागली असल्याची माहिती मिळत आहे. हे जहाज कृष्णपटनम येथून कोलकाताला जात असताना ही आग लागली. कंटेनरमध्ये स्फोट झाल्यानंतर ही आग लागली आहे. जहाजावर एकूण २२ क्रू मेम्बर होते. यापैकी ११ जणांना वाचवण्यात यश आलं असून इतरांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे ही आग लागली आहे. जहाजावर आग लागल्याची माहिती मिळताच बचावकार्यासाटी हलदिया येथून मदत पाठवण्यात आली आहे. हवामान खराब असल्या कारणाने आणि वेगाने वारे वाहत असल्या कारणाने आग वेगाने वाढत आहे. २२ पैकी ११ क्रू मेम्बर्सना वाचवण्यात यश आलं असून अद्यापही बचावकार्य अद्यापही सुरु आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire in ship mv ssl after container blast
First published on: 14-06-2018 at 13:18 IST