पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीवर गोळीबार करण्यात आला आहे. या हल्ल्यात इम्रान खान जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे इम्रान खान यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरास अटक करण्यात आली आहे. हल्ल्यानंतर इम्रान खान यांच्या समर्थकांनी आरोपीला पकडून त्याला मारहाणदेखील केली आहे.

हेही वाचा >>> Firing at Imran Khans Rally : गोळीबारात जखमी झाल्यानंतर इम्रान खान यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

नेमकं काय घडलं?

इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफकडून (पीटीआय) पाकिस्तानमध्ये तातडीने निवडणुका घ्याव्यात अशी मागणी केली जात आहे. याच मागणीला घेऊन लाहोर ते इस्लामाबादपर्यंत ‘हकीकी आझादी मार्च’ नावाने महामोर्चा काढण्यात आला आहे. हा मोर्चा ४ नोव्हेंबर रोजी इस्लामाबाद येथे पोहोचणार होता. मात्र त्याआधीच वझिराबाद येथील जफर अली खान चौक येथे हा मोर्चा आल्यानंतर त्यावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात इम्रान खान यांच्या पायाला जखम झाली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर हल्लेखोरास पोलिसांनी अटक केली आहे.

हेही वाचा >>> निवडणुकीच्या तारखा घोषित होताच केजरीवाल यांचा गुजराती भाषेत व्हिडीओ; श्रीराम, अयोध्येचा उल्लेख करत म्हणाले, “फक्त एक…”

इम्रान खान यांच्या समर्थकांनी हल्लेखोराला दिला चोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इम्रान खान यांच्या मोर्चावर हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गोळीबारानंतर मोर्चामध्ये सामील झालेल्या इम्रान खान समर्थकांनी हल्लेखारास पकडून त्याला चोप दिला. त्यानंतर पोलिसांनी या हल्लेखोरास अटक केली आहे.