First Miss World : विश्वसुंदरी हा किताब पहिल्यांदा मिळवणाऱ्या किकी हॅकन्सन यांचं वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झालं आहे. १९५१ मध्ये किकी हॅकन्सन यांच्या डोक्यावर विश्वसुंदरी या बिरुदाचा मुकुट ठेवण्यात आला होता. जगातल्या पहिल्या विश्वसुंदरीने आज जगाचा निरोप घेतला आहे. कॅलिफोर्निया या त्यांच्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

किकी हॅकन्सन यांचं वयाच्या ९५ व्या वर्षी निधन

किकी हॅकन्सन ( First Miss World ) यांचा मृत्यू झोपेतच झाला. त्या त्यांच्या कॅलिफोर्निया येथील घरी होत्या. त्यांच्या कुटुंबाने सांगितलं की, “किकी हॅकन्सन यांना ४ नोव्हेंबरच्या रात्री झोपेत असतानाच देवाज्ञा झाली.” त्यांच्या मृत्यूची घोषणा इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन करण्यात आली आहे.

किकी हॅकन्सन यांनी रचला होता इतिहास

किकी हॅकन्सन ( First Miss World ) यांनी १९५१ मध्ये झालेल्या मिस वर्ल्ड या स्पर्धेत भाग घेतला आणि ही स्पर्धा त्या जिंकल्या. किकी हॅकन्सन यांनी जिंकलेल्या मिस वर्ल्ड या किताबामुळे या पुरस्काराची परंपरा जगात सुरु झाली. मिस वर्ल्ड हे या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या पोस्टवरुन किकी हॅकन्सन यांना आदरांजली वाहण्यात आली आहे. आम्ही सगळे किकी हॅकन्सन यांच्या दुःखात सहभागी आहोत. आमचं प्रेम, सद्भवाना हे कायमच किकी हॅकन्सन यांच्या कुटुंबासह असेल अशी पोस्ट या पेजवरुन कऱण्यात आली आहे. किकी हॅकन्सन यांनी मिस वर्ल्ड हा किताब जिंकण्याआधी मिस स्वीडन हा किताबही जिंकला होता.

किकी हॅकन्सन यांच्या मुलाने काय म्हटलं आहे?

किकी हॅकन्सन ( First Miss World ) यांचा मुलगा ख्रिस अँडरसन यांनी म्हटलं आहे माझी आई आज जगात नाही, ती खूप दयाळू, प्रेमळ आणि एखाद्या मैत्रिणीप्रमाणे होती. तिची विनोदबुद्धी खूप चांगली होती तसंच ती अत्यंत मोठ्या मनाची होती. तिने जे संस्कार आमच्यावर केले आहेत त्यामुळे आम्हाला कायमच तिची आठवण येत राहिल.”

View this post on Instagram

A post shared by Miss World (@missworld)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जुलिया मॉर्ले काय म्हणाल्या?

मिस वर्ल्ड स्पर्धेच्या अध्यक्षा जुलिया मॉर्ले म्हणाल्या, किकी हॅकन्सन ( First Miss World ) यांनी मिस वर्ल्ड हा किताब जिंकून इतिहास रचला. पहिल्या विश्वसुंदरी म्हणून त्या कायमच स्मरणात राहतील. आम्ही त्यांना विसरणं शक्य नाही. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. १९५१ मध्ये, पहिली मिस वर्ल्ड स्पर्धा एरिक मॉर्ले यांनी आयोजित केली होती. स्वीडनमधील विजेत्या किकी हॅकन्सन यांना बिकिनीमध्ये मुकुट घालण्यात आला होता. १९५१ मध्ये पहिल्या ‘मिस वर्ल्ड’ सौंदर्य स्पर्धेतील स्पर्धकांनी ‘बिकिनी’ परिधान केली होती.  त्याचीही चर्चा त्या काळात झाली होती.