पीटीआय, अहमदाबाद, जयपूर

‘बिपरजॉय’ वादळ क्षीण होऊन त्याचे कमी दाबक्षेत्रात रुपांतर झाल्यानंतर गेल्या २४ तासांत उत्तर गुजरात आणि राजस्थानला मुसळधार पावसाने झोडपले.गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यात अनेक गावांत पूरसदृश स्थिती निर्माण झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी दिली. धनेरा तालुक्यातील अनेक गावांत पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. जडिया गावात सुमारे २० गायी वाहून गेल्यानंतर मृत्युमुखी पडल्या आहेत. गुजरातच्या सौराष्ट्रासह अनेक भागांत पुढील दोन दिवसांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, अस अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

राजस्थानमधील अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. पाली आणि जालौर जिल्ह्यांत पुरात अडकलेल्या सुमारे ३० जणांची सुटका करण्यात आली. संततधारेमुळे अजमेरमधील एक सरकारी रुग्णालय जलमय झाले आहे, असे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तत्पूर्वी, रविवारी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाने (एसडीआरएफ) जालौरच्या भीनमाल शहरातील पूरग्रस्त ओड वस्तीमधून ३९ रहिवाशांना वाचवले.