NTR Daughter Uma Maheswari Death : तेलूगू देसम पार्टीचे संस्थापक तसेच आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत एन टी रामाराव यांची मुलगी के उमा माहेश्वरी (६० वर्षे) हैदराबादमधील त्यांच्या ज्युबली हिल्स येथील निवासस्थानी मृतावस्थेत आढळून आल्या. माहेश्वरी यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा >>> एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांनी घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट

एनटी रामाराव यांच्या १२ मुलांपैकी माहेश्वरी या सर्वात लहान होत्या. माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपा नेत्या दग्गुबती पुरंदेश्वरी, नारा भुवनेश्वरी तसेच तेलुगू देसम पार्टीचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नी उमा माहेश्वरी यांच्या बहिणी आहेत. माहेश्वरी यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच चंद्राबाबू नायडू तसेच त्यांचा मुलगा नारा लोकेश आणि कुटुंबातील इतर सदस्य उमा माहेश्वरी यांच्या निवासस्थानी पोहोचले होते.

हेही वाचा >>> विश्लेषण : तामिळनाडूमध्ये जाहिरातीमुळे वाद, सरकारी जाहिरातींमध्ये कोणाचे फोटो असावेत? न्यायालय काय सांगते?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उमा माहेश्वरी जुबली हिल्स येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या पतीसोबत राहायच्या. दरम्यान, माहेश्वरी यांनी आत्महत्या केल्याचा संशय असून पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.