दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गुरुवारी तब्बल ८ तासांच्या चौकशीनंतर ईडीने त्यांना अटक केली आहे. ईडी मद्य धोरण घोटाळ्यात मनी लाँड्रिंगची चौकशी करत आहे. याप्रकरणी चौकशी करण्यासाठी ईडीची टीम गुरुवारी सिसोदिया यांची चौकशी करण्यासाठी तिहारमध्ये दाखल झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार ईडीने दोन दिवस सिसोदिया यांची चौकशी केली. सक्तवसुली संचालनालयाने आधी ७ मार्च रोजी सिसोदिया यांची तब्बल ६ तास चौकशी केली. त्यानंतर ९ मार्च रोजी २ तास चौकशी केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिसोदिया यांनी ईडीच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं दिली नाहीत. त्यानंतर सिसोदिया यांना अटक करण्यात आली. दरम्यान, ईडीने सिसोदिया यांना अटक केल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. जनता सर्वकाही पाहात आहे, असं ट्विट देखील केजरीवाल यांनी केलं आहे.

हे ही वाचा >> MNS Anniversary: “जेव्हा मनसेची स्थापना केली, तेव्हा खरंच सांगतो…”, राज ठाकरेंच्या आवाजातला Video मनसेनं केला शेअर!

ईडीने तिहार जेलमध्ये जाऊन सिसोदिया यांची चौकशी करण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली होती. न्यायालयाने ईडीला सिसोदिया यांची जबानी नोंदवण्यासाठी नोंदवण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली होती. सक्तवसुली संचालनालयाने २२ ऑगस्ट २०२२ रोजी कथित मद्य घोटाळ्यात मनी लाँड्रिंग प्रकरण दाखल केलं होतं. ६ महिन्यांच्या तपासानंतर सीबीआयने सिसिदिया यांना अटक केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former delhi deputy cm manish sisodia arrested by enforcement directorate in liquor policy case asc
First published on: 09-03-2023 at 19:38 IST