केरळच्या माजी आरोग्य मंत्री के. के. शैलेजा यांनी प्रतिष्ठित ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कार नाकारला आहे. करोना आणि निपाह विषाणूच्या प्रसारादरम्यान केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना २०२२ सालाचा ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कार देण्यात येणार होता. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या CPI(M) नेत्या शैलेजा यांनी पक्षाशी चर्चा केल्यानंतर या संदर्भात निर्णय घेतला आहे. या पुरस्काराला आशियाचा नोबल पुरस्कार असे देखील संबोधले जाते.

“जेव्हा टीव्ही बघते, तेव्हा मुख्यमंत्री…” घरगुती दौऱ्यावरून सुप्रिया सुळेंचा एकनाथ शिंदेंना टोला

२०१६ ते २०२१ या कालावधीत शैलेजा केरळच्या आरोग्य मंत्री होत्या. याच काळात देशभरासह केरळात मोठ्या प्रमाणात करोनाचा प्रसार झाला होता. केरळमध्ये करोनाचा प्रसार रोखण्यासाठी शैलेजा यांचे मोठे योगदान आहे.

“भाजपा, आरएसएसने देशाचे विभाजन केले”; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, “२०१४ पासून भारतात….”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फिलिपिन्सचे माजी अध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. “मॅगसेसे हे कम्युनिस्ट विरोधी होते. एक व्यक्ती म्हणून माझा या पुरस्कारासाठी विचार करण्यात आला. मात्र मी एक राजकारणी असल्यामुळे यासंदर्भात पक्षाशी चर्चा केली. त्यानंतरच हा पुरस्कार नाकारण्याचा निर्णय घेण्यात आला. या पुरस्कारासाठी माझ्या नावाचा विचार करण्यात आला, याबाबत मी पुरस्कार समितीची आभारी आहे”, अशी प्रतिक्रिया शैलेजा यांनी दिली आहे. “मी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीची सदस्य आहे. हा एक मोठा पुरस्कार असला तरी तो एका गैर सरकारी संस्थेकडून देण्यात येतो. ही संस्था सामान्यत: कम्युनिस्टांच्या तत्वांचे समर्थन करत नाही”, असेही शैलजा म्हणाल्या आहेत. ‘रॅमन मॅगसेसे’ हा आशियातील सर्वोच्च पुरस्कार आहे. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना आणि संस्थांना १९५७ पासून हा पुरस्कार देण्यात येतो.