चंदा कोचर यांच्या मुंबईतल्या घरासह ७८ कोटींच्या मालमत्तेवर ईडीची टाच

चंदा कोचर यांच्या अडचणींमध्ये भर

चंदा कोचर (संग्रहित छायाचित्र)

आयसीआयसीआय बँकेच्या माजी प्रमुख चंदा कोचर यांच्या मुंबईतलं घर, त्यांच्या पतीचे ७८ कोटींचे मूल्य असलेले शेअर्स या सगळ्यावर ईडीने म्हणजेच अंमलबजावणी संचलनालयाने टाच आणली आहे. त्यामुळे चंदा कोचर यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत.

चंदा कोचर यांच्या घरासह एकूण ७८ कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केल्यामुळे त्यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. चंदा कोचर या आयसीआयसीआय बँकेच्या माजी प्रमुख असताना त्यांनी पदाचा गैरवापर केला असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

मर्जीतल्या लोकांचा आर्थिक फायदा केल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) चंदा कोचर, वेणूगोपाल धूत यांच्यासह इतर पाचजणांविरोधात गुन्हा दाखल केला. चंदा कोचर यांच्या सोबत त्यांचे पती, त्यांच्या सहकारी व्हिडीओकॉन कंपनीचे दोन युनीट आणि कोचर यांच्या न्यू पॉवर रेनेवेबल्स तसेच सुप्रीम एनर्जी या कंपन्यांचाही यामध्ये समावेश आहे. २००९ मध्ये चंदा कोचर यांनी आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर असताना नियम डावलून तसेच पदाचा गैरवापर करत वेणूगोपाल धूत यांच्या व्हिडिओकॉन उद्योगसमूहाला ३०० कोटींचे कर्ज दिले होते. ज्यानंतर धूत यांनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या व्यवसायात ६४ कोटी रुपयांचे भांडवल गुंतवले. आता या सगळ्या प्रकरणी चंदा कोचर यांच्या घरासह एकूण ७८ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Former icici bank ceo chanda kochhars mumbai home and her husbands shares wort 78 crore seized by ed scj

Next Story
चीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी
ताज्या बातम्या