ओबामा दाम्पत्याने ‘या’ भारतीय फिल्ममेकरला दिली पसंती

लैंगिक अत्याच्यारांविरोधात आवाज उठवणाऱ्या ‘टाइम्स अप’ या चळवळीचाही ती भाग होती.

Barack Obama , Michelle Obama
बराक ओबामा, मिशेल ओबामा, Barack Obama , Michelle Obama

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा हे दोघंही सध्या नेटफ्लिक्ससाठीच्या निर्मिती संस्थेच्या कामात व्यग्र आहेत. हॉलिवूडमधील सुत्रांचा हवाला देत ‘डीएनए’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार सामाजिक कार्यकर्ती आणि फिल्ममेकर प्रिया स्वामीनाथन हिची ओबामा दाम्पत्याने निवड केली आहे.

एका मोठ्या आणि महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टवर ती काम करणार असल्याचं कळत आहे. यापूर्वी तिने २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वेरी यंग गर्ल्स’ची निर्मिती केली असून त्याच्या सहदिग्दर्शनाची धुराही सांभाळली होती. या लघुपटातून न्यूयॉर्कमधील अल्पवयीन देहविक्री करणाऱ्या वर्गावर भाष्य करण्यात आलं होतं. त्याशिवाय प्रियाने ‘अन्नपूर्णा पिक्चर्स’साठीही काही काळ काम पाहिलं होतं.

वाचा : मृत्यू मला कोणत्याही क्षणी कवटाळू शकतो- इरफान खान

तळागाळातील चित्रपट निर्माते, दिग्दर्शकांना वाव देण्यासाठी म्हणून राबवण्यात आलेल्या ‘सनडान्स इन्स्टिट्यूट’च्या ‘फिल्म टु’ या उपक्रमातही ती सहभागी होती. त्यासोबतच लैंगिक अत्याच्यारांविरोधात आवाज उठवणाऱ्या ‘टाइम्स अप’ या चळवळीचाही ती भाग होती. त्यामुळे आता चित्रपट आणि काही अफलातून सीरिजसाठी ओळखल्या जाणाऱ्या नेटफ्लिक्सवर ओबामा दाम्पत्य आणि प्रियाची ही नवी इनिंग कशी असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुख्य म्हणजे ओबामा दाम्पत्याचं सामाजिक कामांमध्ये असणारं योगदान आणि त्याच मार्गाने त्यांनी उचललेली काही पावलं याकडे पाहता, आता नेटफ्लिक्सवर त्यांच्या निर्मिती संस्थेकडून साकारण्यात येणाऱ्या कलाकृतीवरही त्याचं प्रतिबिंब पडणार ही बाब नाकारता येत नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Former president barack obama and first lady michelle obama hire indian origin filmmaker priya swaminathan for their netflix project

ताज्या बातम्या