भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कोमात गेले आहेत. त्यांच्या प्रकृतीत अद्याप काहीही सुधारणा झालेली नाही. त्यांना व्हेंटिलेटरवरच ठेवण्यात आलं आहे. आर्मी रुग्णालयाने ही माहिती दिली. त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा नसल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. एएनआयने या संदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. १० ऑगस्टपासून प्रणव मुखर्जी यांची प्रकृती बिघडली आहे. १० तारखेच्या एक दिवस आधीच त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. १० ऑगस्ट रोजी त्यांच्या मेंदूत असलेल्या गाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीत काहीही सुधारणा झालेली नाही. आता ते कोमात गेले आहेत असं आर्मी रुग्णालयाने स्पष्ट केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज सकाळीच त्यांच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर काही अफवा पसरल्या. ज्यानंतर प्रणव मुखर्जी यांच्या मुलाने म्हणजेच अभिजित मुखर्जी यांनी ट्विट करुन माहिती दिली की माझे वडील प्रणव मुखर्जी सुखरुप आहेत त्यांच्याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. गेल्या तीन ते चार दिवसांपासून ते आजारी आहेत. मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती प्रणव मुखर्जी यांनी स्वतः ट्विट करुन दिली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former president pranab mukherjee in coma vital parameters stable says army hospital scj
First published on: 13-08-2020 at 13:00 IST