येथील दामोदर नदीत बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चार जण मृत्युमुखी पडले असून त्यापैकी तीन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर चौथ्या व्यक्तीच्या मृतदेहांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. रघुनाथपूर येथून शुक्रवारी रात्री १२ जण बोटीतून शेजारी राज्य असलेल्या झारखंडमधील आपल्या गावाकडे निघाले असताना ही दुर्घटना घडली. बोट उलटल्यानंतर १२ पैकी आठ जण पोहून किनाऱ्यावर आले, असे जिल्हा दंडाधिकारी गुलाम अली अन्सारी यांनी सांगितले.