पीटीआय, उदयपूर

राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने मंगळवारी ५६ उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. राष्ट्रीय प्रवक्ते गौरव वल्लभ यांना उदयपूरमधून तर भाजपमधून आलेल्या मानवेंद्र सिंह यांना सिवानामधून उमेदवारी देण्यात आली आहे.

राज्यात २५ नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीसाठी काँग्रेसने आतापर्यंत १५१ उमेदवारांची घोषणा केली आहे. मंगळवारी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, मुख्यमंत्री अशोक गेहलोत, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (एआयसीसी) राज्याचे प्रभारी सुखजिंदर रंधवा आणि पक्षाचे प्रदेश प्रमुख गोविंद दोतसरा या बैठकीला उपस्थित होते. तसेच सरचिटणीस के सी वेणुगोपाल आणि छाननी समितीचे अध्यक्ष गौरव गोगोई हेही हजर होते. दरम्यान, माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी टोंक मतदारसंघातून निवडणूक अर्ज दाखल केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.