अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांच्या विरोधात बोगस मतदान झाल्याचा दावा दाखवणं फॉक्स न्यूजलाला चांगलंच महागात पडलं आहे. कारण या प्रकरणात आता फॉक्स न्यूजने भरपाई म्हणून ७८.७५ कोटी डॉलर्सची भरपाई द्यावी लागणार आहे. फॉक्स न्यूजवर हा आरोप आहे की त्यांनी २०२० च्या राष्टाध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या दरम्यान चुकीचं वृत्त दिल्याचा आरोप आहे. फॉक्स न्यूजच्या विरोधात मानहानीचा दावा करण्यात आला होता. आता तडजोड म्हणून फॉक्स न्यूज ७८.७५ कोटी डॉलर्स म्हणजेच जवळपास ५८ हजार कोटी रूपये हे भरपाई म्हणून देणार आहेत. अमेरिकेतल्या मीडिया कंपनीने भरपाई म्हणून दिलेली ही सर्वाधिक रक्कम आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

कायदेशीर लढाईच्या दरम्यान फॉक्स न्यूजच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण करण्यात आला होता. चॅनलवर हा आरोप होता की डोमिनियने राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत गोंधळ केला होता. कंपनीच्या एका प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार फॉ्क्स न्यूजने ही सेटलमेंट केली आहे त्यामुळे आता त्यांना आम्ही निवडणुकीच्या दरम्यान चुकीच्या बातम्या दिल्या होत्या त्याबद्दल दिलगीर आहोत हे सांगावं लागणार नाही.

Financial burden, Mhada, lease,
भाडेपट्ट्यात सवलत न दिल्याने म्हाडावासीयांवर आर्थिक बोजा!
bikes become expensive due to high tax says rajiv bajaj
जास्त करामुळे दुचाकी महागल्या! राजीव बजाज यांची टीका; नियामक चौकटीकडेही बोट
Survey, Finds 58 percentage Indians, Suffer from Mosquito Bites, Affecting sleep, Affecting Productivity, Mosquito Bites, Indians Mosquito Bites, gcpl survey,
डासांमुळे निम्म्या भारतीयांची होतेय झोपमोड; महाराष्ट्रासह पश्चिम भारताला बसतोय सर्वाधिक फटका
sensex again at the level of 74 thousand print eco news
तेजीवाल्यांची पकड मजबूत; सेन्सेक्स पुन्हा ७४ हजारांच्या उंबरठ्यावर

डोमिनियनने असा युक्तिवाद केला की फॉक्सने डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात मतदानात हेराफेरी केल्याचा खोटा दावा पसरवला, त्यामुळे व्यवसायाचे नुकसान झाले आहे. फॉक्स न्यूजने असंही म्हटलं आहे की हे प्रकरण निकाली लागल्याने आम्ही समाधानी आहोत. २०२० च्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ट्रम्प यानी काही खोटे दावे केले होते. हे दावे फॉक्स न्यूजवर तसेच्या तसे प्रसारित करण्यात आले होते.

त्यावेळी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी दिलेल्या बातम्यांमुळे चॅनलच्या प्रतिष्ठेला धक्का लागला होता. खोटी बातमी दिल्याने चॅनलच्या विश्वासर्हतेवर प्रश्न निर्माण झाला आणि पत्रकारितेवर प्रश्न विचारला गेला. आता ५८ हजार कोटींच्या भरपाईनंतर फॉक्स न्यूजवर काय परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. बीबीसीने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.