उत्तर प्रदेशसह दिल्लीत अलिकडच्या काळात गँगवॉरच्या घटनांचं प्रमाण वाढलं आहे. दिल्लीतल्या जाफराबाद परिसरात सोमवारी संध्याकाळी अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत चार जणांवर गोळीबार झाला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. जाफराबादमधल्या गल्ली क्रमांक ३८ मध्ये घडलेल्या या घटनेने संपूर्ण जाफराबाद हादरलं आहे. हमजा नावाचा एक तरूण घराबाहेर गल्लीत त्याच्या मित्रांसमवेत बसला होता. याचवेळी काही हल्लेखोर बाइकवरून तिथे आले आणि त्यांनी अंधाधूंद गोळीबार केला. या गोळीबारात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या चारही तरुणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या जखमींच्या नातेवाईकांनी आणि शेजाऱ्यांनी चारही जखमी तरुणांना सर्वात आधी जवळच्या जग प्रवेश चंद्र रुग्णालयात नेलं परंतु त्यांची गंभीर परिस्थिती पाहून डॉक्टरांनी त्यांना जीटीबी रुग्णालयात नेण्यास सांगितलं. दुसऱ्या बाजूला या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु त्याआधीच हल्लेखोर पसार झाले होते. पोलीस हल्लेखोरांचा तपास करत आहेत. यासाठी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेतला जात आहे.

Clashes Erupt, Between Groups, During Shri Ram Navami Procession, Nagpur Police Lathi Charge, Control Situation, ram navami nagpur clashes, nagpur ram navami, crime story nagpur, clashes ram navami, ram navami clashes,
नागपुरात आक्रित…रामनवमीच्या शोभायात्रेत पोलिसांवर दगडफेक! पोलिसांकडून लाठीचार्ज…
Pune, firing, Firing on youth,
पुणे : शहरात गोळीबारची तिसरी घटना, काडीपेटी न दिल्याने तरुणावर गोळीबार
Tehsil Office Tehsildar Sachin Shankarlal Jaiswal of Sindkhedaraja arrested for accepting bribe
तहसीलदाराकडे सापडले तब्बल ४६ लाखांचे घबाड! लाच स्वीकारतांना अटक
Kolhapur Police arrest gang selling fake notes
बनावट नोटांची छपाई, विक्री करणारी टोळी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात; म्होरक्याचे नेत्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा

हे ही वाचा >> विरोधकांच्या बैठकीआधीच वर्चस्वाचा वाद चव्हाट्यावर

दरम्यान, यापैकी जखमी तरुणाची आई शायरा बानो यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांशी बातचित केली. त्या म्हणाल्या, माझ्या दोन्ही मुलांना गोळी मारली आहे. परंतु माझ्या मुलांचं कोणाशीही भांडण नाही. तर पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे की, हे गँगवॉर असावं. कारण ज्या चार जणांना गोळी लागली आहे त्यापैकी एक जण नुकताच तुरुंगातून बाहेर आला होता. तोच तरुणी हल्लेखोरांच्या निशाण्यावर होता.