जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) शुक्रवारी पुन्हा एकदा डेल्टा व्हेरिंएटबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळे परिस्थिती बिघडण्यापूर्वी त्याचा प्रसार कमी करावा लागेल असे जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. वेगाने पसरणारा डेल्टाचा प्रकार, जो आधीच भारतात सापडला आहे, आता १३२ देश आणि प्रदेशांमध्ये आढळून आल्याचे आरोग्य संघटनेनं सांगितलं.

डब्ल्यूएचओचे आपत्कालीन संचालक मायकेल रायन यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. “डेल्टा एक धोक्याचा इशारा आहे. हा एक इशारा आहे की हा व्हायरस पसरत आहे, पण याचे अधिक धोकादायक रूप समोर येण्यापूर्वी आपल्याला समजून घ्यावा लागेल असे त्यांनी म्हटलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. टेड्रॉस यांनी ही याबाबत भाष्य केलं आहे. “आतापर्यंत, चार चिंताजनक करोना व्हायरसचे प्रकार समोर आले आहेत आणि व्हायरस पसरत राहिल्याने आणखी येत राहतील. डब्ल्यूएचओच्या सहापैकी पाच क्षेत्रांमध्ये, गेल्या चार आठवड्यांत सरासरी संसर्ग ८० टक्क्यांनी वाढला आहे, असे टेड्रॉस म्हणाले.

हे ही वाचा >>‘डेल्टा’चा प्रसार कांजिण्यांच्या विषाणूंप्रमाणे

मास्क आणि सोशल डिस्टंसिंग अजूनही प्रभावी

रायन म्हणाले की, जरी डेल्टाने अनेक देशांना हादरवून टाकले असले तरी, त्याचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी उपाय अजूनही आहेत. विशेषतः सोशल डिस्टसिंग पाळणे, मास्क घालणे, हाताची स्वच्छता याद्वारे डेल्टाचा प्रसार टाळता येऊ शकतो. “व्हायरस फिटर झाला आहे, व्हायरस वेगाने वाढच आहे. करोना रोखण्यासाठी हे उपाय अजूनही काम करत आहे, पण आपल्याला आधीपेक्षा अधिक कार्यक्षम आणि अधिक प्रभावीपणे हे उपाय अंमलात आणण्याची गरज आहे,” असे रायन म्हणाले.

डेल्टामुळे करोनाची चौथी लाट येण्याची शक्यता

करोना रुग्णांची वाढती संख्या भारतातील तिसऱ्या लाटेचे कारण बनत असताना, डेल्टा प्रकार जगातील अनेक देशांमध्ये करोनाच्या चौथ्या लाटेचे कारण बनत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की करोनाच्या डेल्टा प्रकाराने मध्य-पूर्व देशांमध्ये चौथ्या लाटेचे स्वरूप घेतले आहे आणि करोना विषाणूच्या प्रकरणांमध्ये तीव्र वाढ झाली आहे. मध्यपूर्वेतील देशांमध्ये लसीकरणाचे प्रमाण खूप कमी आहे.

ग्लोबल हेल्थ ऑर्गनायझेशनने गुरुवारी एका निवेदनात म्हटले आहे की डब्ल्यूएचओच्या पूर्व भूमध्य प्रदेशातील डेल्टा व्हेरिएंटमुळे करोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे आणि हे व्हेरियंट करोनामुळे मृत्यू होत आहे. या क्षेत्रातील २२ पैकी १५ देशांपैकी आतापर्यंत करोनाची चौथी लाट येत असल्याचे चित्र आहे.