अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचे त्यांच्या देशावर प्रेम नाही असे वादग्रस्त विधान न्यूयॉर्कचे माजी महापौर रुडी गिलियानी यांनी केले आहे. त्यांचे विधान अत्यंत भयानक असल्याची प्रतिक्रिया व्हाइट हाऊसने दिली आहे.
मॅनहटन येथे एका क्लबमध्ये भोजनप्रसंगी गिलियानी यांनी सांगितले की, तुम्हाला कदाचित भयानक वाटेल पण अध्यक्ष बराक ओबामा यांचे देशावर प्रेम नाही असे आपल्याला वाटते.
ते ज्या पद्धतीने अभिव्यक्त होतात त्यावरून तरी असे वाटते, पण त्यांच्या मनात नेमके काय आहे हे आपण सांगू शकत नाही. ते तुमच्यावर, माझ्यावर प्रेम करीत नाहीत. तुमची आमची या देशात जशी वाढ झाली तशी त्यांची नाही त्यामुळे त्यांचे देशावर प्रेम नाही, अशीही टीका गिलियानी यांनी केली.
गिलियानी यांनी सीएनएनला दिलेल्या मुलाखतीतही ओबामा हे अमेरिकेवर टीका करायला शिकवणाऱ्या वातावरणात वाढलेले आहेत. त्यांच्यात आणि पूर्वीच्या अध्यक्षांमध्ये हा फरक आहे. ओबामा हे देशभक्त नाहीत याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
व्हाइट हाऊसची प्रतिक्रिया
व्हाइट हाऊसने त्यांचे विधान भयानक असल्याचे म्हटले आहे. व्हाइट हाऊसचे उप प्रसिद्धी सचिव एरिक शुल्झ यांनी सांगितले की, गिलियानी आता त्यांच्या चुकीवर पांघरूण घालून सावरून घेण्याचा प्रयत्न करीत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Feb 2015 रोजी प्रकाशित
ओबामांचे देशावर प्रेम नाही- गिलियानी
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचे त्यांच्या देशावर प्रेम नाही असे वादग्रस्त विधान न्यूयॉर्कचे माजी महापौर रुडी गिलियानी यांनी केले आहे.

First published on: 22-02-2015 at 01:49 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Giuliani obama under communist influence