युरोपीय महासंघाची नरेंद्र मोदींकडून अपेक्षा
गुजरातच्या जनतेने नरेंद्र मोदी यांना सलग चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान केले असले तरी त्यांच्यावर लागलेला ‘गुजरात दंगली’चा बट्टा अद्याप पुसला गेलेलाच नाही. या दंगलीबाबत अद्याप मोदी यांनी या दंगलीची जबाबदारी स्वीकारत आंतरराष्ट्रीय समुदायाला उत्तर दिलेले नसून त्याची आता खरी गरज असल्याचा टोला युरोपीय महासंघाने हाणला आहे.
गुजरातच्या विजयानंतर नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय समुदायाला साद घातली होती. मागील महिन्यात युरोपीय महासंघाच्या शिष्टमंडळाशी चर्चाही त्यांनी केली. मात्र, याच चर्चेदरम्यान गुजरात दंगलीचा मुद्दा उपस्थित झाल्याचे युरोपीय महासंघाचे भारतातील राजदूत जोआओ काव्र्हिन्हो यांनी सांगितले.
गुजरात दंग्यानंतर युरोपीयन संघाकडून मोदींवर टाकण्यात आलेल्या दहा वर्षांच्या बहिष्काराबाबतच्या प्रश्नासंबंधात बोलताना काव्र्हिन्हो म्हणाले की, दंगलीबद्दल भारतातीलच नव्हे तर जगभरातील नागरिकांनीही चिंता व्यक्त केली होती. नरोडा पटिया दंगलप्रकरणी गेल्या वर्षी गुजरात न्यायालयाने भाजप नेत्या माया कोदनानी आणि बजरंग दलाचे नेते बाबू बजरंगी यांच्यासह ३० जणांना दोषी ठरवले. यावरून भारतात न्यायप्रक्रिया संथ असली तरी न्याय दिला जातोच, असेही ते म्हणाले. दरम्यान, गेल्या ऑक्टोबरमध्ये इंग्लंडने गुजरातवर लादलेली बंदी उठवत आर्थिक क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी भारतातील इंग्लंडचे उच्चायुक्त जेम्स बेवन यांनी मोदी यांची भेट घेऊन मैत्रीच्या नव्या पर्वाची सुरुवात केली.
संग्रहित लेख, दिनांक 8th Feb 2013 रोजी प्रकाशित
गुजरात दंगलीबाबत उत्तर द्या
गुजरातच्या जनतेने नरेंद्र मोदी यांना सलग चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान केले असले तरी त्यांच्यावर लागलेला ‘गुजरात दंगली’चा बट्टा अद्याप पुसला गेलेलाच नाही. या दंगलीबाबत अद्याप मोदी यांनी या दंगलीची जबाबदारी स्वीकारत आंतरराष्ट्रीय समुदायाला उत्तर दिलेले नसून त्याची आता खरी गरज असल्याचा टोला युरोपीय महासंघाने हाणला आहे.
First published on: 08-02-2013 at 04:16 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Give answer on gujrat riot matter