भारताच्या इतिहासकालीन ऐश्वर्याचे प्रतिक असणारा ब्रिटनमधील कोहिनूर हिरा भारताला परत करण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ब्रिटनमधील भारतीय वंशाचे खासदार कीथ वाझ यांनी ‘कोहिनूर’ भारताला परत देण्याची मागणी उचलून धरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या नोव्हेंबरमध्ये ब्रिटनला भेट देत असून त्यावेळी कोहिनूर त्यांच्याकडे देण्यात यावा, असे कीथ यांनी म्हटले आहे. वाझ हे गेल्या अनेक वर्षांपासून ब्रिटनमध्ये खासदार असून यापूर्वीही त्यांनी कोहिनूर भारताला परत करण्याबाबत मोहीम राबवली होती. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते शशी थरूर यांनी लंडनमधील व्याख्यानादरम्यान उपस्थित केलेल्या मुद्द्यांनाही कीझ यांनी पाठिंबा दिला आहे. ब्रिटिशांनी भारतावर २०० वर्षे राज्य केले. त्या काळात केलेल्या पिळवणुकीची भरपाई ब्रिटनने भारताला दिली पाहिजे, असे थरूर यांनी म्हटले होते. आपण थरूर यांच्या विचारांचे स्वागत करत असल्याचे कीझ यांनी सांगितले.
कोहिनूर हा जगप्रसिद्ध हिरा सन १८५०मध्ये राणी व्हिक्टोरियाला हा हिरा भेट देण्यात आला होता. भारताने यापूर्वीही अनेकदा कोहिनूर परत मिळविण्यासाठी प्रयत्न केले होते. याबाबत ब्रिटन आणि भारत या दोन्ही देशांमध्ये अनेकदा चर्चाही झाली होती. मात्र, ब्रिटनकडून वेळोवेळी ही मागणी फेटाळण्यात आली होती.
संग्रहित लेख, दिनांक 29th Jul 2015 रोजी प्रकाशित
‘कोहिनूर हिरा भारताला परत करा’
भारताच्या इतिहासकालीन ऐश्वर्याचे प्रतिक असणारा ब्रिटनमधील कोहिनूर हिरा भारताला परत करण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

First published on: 29-07-2015 at 10:02 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Give back kohinoor diamond to india