बिहार विधानसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान बुधवारी होणार असल्याच्या पाश्र्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मतदारांना पुन्हा नितीशकुमार यांनाच निवडून देण्याचे आवाहन केले आहे.
बिहारमधील बंधू आणि भगिनींनी नितीशकुमार यांनाच पुन्हा निवडून द्यावे, असे आवाहन केजरीवाल यांनी केले आहे. केजरीवाल यांनी नितीशकुमार यांच्या उमेदवारीला पूर्ण पाठिंबा जाहीर केला. तथापि, केजरीवाल निवडणुकीत जद(यू)चा प्रचार करणार नाहीत.