मोरपंखी निळ्या रंगाचा नील रत्न ही काश्मीरची खासियत आहे. आता हे मोल्यवान रत्न खाणकाम करून बाहेर काढण्यासाठी जम्मू-काश्मीर सरकारने जागतिक निविदा मागवल्या आहेत.
कुठे सापडते नीलरत्न
हिमालयाच्या बर्फाच्छादित अशा पड्डार खोऱ्यात नीलरत्नाच्या खाणी आहेत. अतिशय आश्चर्यकारक असे रत्न आहेत. सौदर्यालंकारांमध्ये त्यांचा वापर केला जातो, त्यांचा रंग जांभळट निळा असतो. मोराच्या मानेचा जो रंग असतो तो या रत्नात दिसून येतो.

किंमत किती?
या नीलरत्नाची किंमत कॅरटला १ लाख अमेरिकी डॉलर आहे. यापूर्वीही या नीलरत्नाच्या खाणकामासाठी निविदा मागवल्या गेल्या होत्या पण त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. पड्डार खोऱ्यातील ४३२७ मीटर उंचीवरील ६.६५ वर्ग कि.मीचे क्षेत्र खाणकामासाठी जेकेएमएलला भाडेपट्टय़ाने दिले आहे. या कंपनीने उन्हाळ्याच्या दोन महिन्यात ८००० ग्रॅम कच्चे नीलरत्न शोधून काढले व ते गेल्या दोन वर्षांत लिलावात विकण्यात आले. न्यूर्यार्क येथील लिलावात ८.९९ कॅरटच्या काश्मिरी नीलरत्नाची प्लॅटिनम अंगठी २.८६ कोटी रूपयांना विकली गेली होती.

अशीही कथा
डय़ुक ऑफ ग्लुसेस्टरने जेव्हा लेडी अलाइस मॉँटेग्यू डग्लस स्कॉट हिला मागणी घातली तेव्हा १९३० मध्ये तिला काश्मिरी नीलरत्नाची अंगठी दिली होती. नंतर क्रिस्टी अ‍ॅले, सुसान सारनडॉन, सारा फर्गसन, इव्हाना माझुशेली ट्रम्प, मॉडेल हिथर मिल्स ज्युडिथ नॅथन व प्रिन्सेस डायना या ललनांना हे नीलरत्न त्यांच्या जोडीदारांनी दिले होते. ही अंगठी आता केट मिडलट्नच्या बोटात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किश्तवार भागात सापडणारा हे मौल्यवान रत्न उच्च दर्जाचे व जागतिक पातळीवर प्रसिद्ध आहे. काश्मीरचे हे नीलमणी आता दुर्मीळ आहेत केवळ खासगी संग्रहातील जे रत्न आहेत तेवढेच सध्या विक्रीस आहेत, आता या रत्नांच्या उत्खननसाठी जम्मू-काश्मीर मिनरल्स लिमिटेड या सरकारी कंपनीने निविदा काढल्या आहेत.
– जम्मू-काश्मीरचे व्यापार मंभी सज्जाद अहमद किचलू