गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनाच पसंती देत पंतप्रधानपदासाठीचे भाजपचे उमेदवार म्हणून मोदींना आपला पाठिंबा असल्याचे गोवा भाजपने जाहीर केले. मात्र त्याच वेळी याबाबत अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींकडून घेण्यात येईल, असेही भाजप प्रवक्त्यांनी नमूद केले.
सद्यस्थितीत देशाला पुढे नेण्याची क्षमता असलेले नेतृत्व केवळ नरेंद्र मोदीच देऊ शकतात, असा विश्वास व्यक्त करतानाच, ही केवळ आपली किंवा भाजपचीच नव्हे, तर कोटय़वधी नागरिकांची भावना असल्याचे गोवा भाजप प्रवक्ते विल्फ्रेड मेस्किटा यांनी सांगितले. मोदी यांच्याकडे प्रभावी प्रशासन कौशल्ये आणि देशाला उन्नतीकडे नेण्याची प्रबळ इच्छाशक्ती असल्याचेही विल्फ्रेड यांनी नमूद केले.