गोवा काँग्रेसचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पक्षाच्या आमदारांना भाजपामध्ये येण्यासाठी ४० कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप केला आहे. गोवा काँग्रेसचे सहा आमदार बंडखोरी करणार असल्याच्या वृत्तानंतर चोडणकर यांनी हा आरोप केल्याने गोव्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

काँग्रेसच्या आमदारांना उद्योगपती आणि कोळसा माफियांकडून फोन केले जात आहेत. ज्या आमदारांशी संपर्क साधण्यात आला, त्यांनी हा खुलासा काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांच्यासमोर केला, असा दावा चोडणकर यांनी केला आहे.

हेही वाचा – सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना निर्णय न घेण्याचा आदेश देताच शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

भाजपने मात्र चोडणकर यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. ”काँग्रेस आमदारांशी संपर्क साधून पैसे देऊ केल्याचे आरोप बिनबुडाचे आहे. या गोष्टींना काही अर्थ नाही. काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या गोंधळाबाबत भाजपाचा कोणाताही संबंध नाही”, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, काँग्रेस आमदार मायकल लोबो यांनीही आमदार बंडखोरी करणार असल्याच्या वृत्ताचे खंडण केले आहे. विधानसभा अधिवेशनापूर्वी जाणूनबुजून भाजपाकडून अफवा पसरवण्यात येत असल्याचा आरोप लोबो यांनी केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – विजय माल्याला चार महिन्यांच्या कारावासाची शिक्षा, कुटुंबीयांना पाठवलेले ४० दशलक्ष डॉलर्सही परत करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश