जगभरातील लोकांसाठी विश्वासाचे सर्च इंजिन असलेल्या ‘गुगल’ने पंतप्रधान नरेंद्र मोदींना जगातील पहिल्या दहा गुन्हेगारांच्या पंक्तीत नेऊन बसविल्याने खळबळ उडाली होती. गुगलवर ‘टॉप १० क्रिमिनल्स’ म्हणून शोध घेतला असता कुख्यात दहशतवादी लादेन, दाउद सोबत मोदींचे छायाचित्र झळकत होते. यामुळे देशभरातून ट्विटरवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुगलने गुरुवारी तातडीने घडल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे. सर्च इंजिनने दाखविलेल्या निकालांमुळे निर्माण झालेल्या गोंधळाबद्दल दिलगीर व्यक्त करीत असल्याचे गुगलने म्हटले आहे. सर्च इंजिनने दाखविलेल्या निकालांचे गुगल समर्थन करीत नसून, यामध्ये सुधारणा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, असेही स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, ट्विटरवर #top10criminals हा ट्रेंड बुधवारी जोरात सुरू होता. यावर विरोधी पक्षांनीही शरसंधान साधण्याची संधी साधली. मोदींची ‘गुन्हेगार’ ही प्रतिमा २००२ मधील दंग्यातील तथाकथित सहभागावरून निर्माण झाली असण्याची शक्यता आहे. दरम्यान, गुगलवर चुकीची माहिती येण्याची ही पहिलीच वेळ नसून २००९ मध्येही अमेरिकेची प्रथम महिला मिशेल ओबामा यांच्याबाबतही चुकीची माहिती दाखविण्यात आली होती.
संग्रहित लेख, दिनांक 4th Jun 2015 रोजी प्रकाशित
सर्च इंजिनमध्ये मोदींना गुन्हेगार दाखविल्यानंतर ‘गुगल’कडून माफी
जगभरातील लोकांसाठी विश्वासाचे सर्च इंजिन असलेल्या 'गुगल'ने पंतप्रधान नरेंद्र मोदींना जगातील पहिल्या दहा गुन्हेगारांच्या पंक्तीत नेऊन बसविल्याने खळबळ उडाली होती.

First published on: 04-06-2015 at 12:43 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google apologises after showing pm modis image in top 10 criminals result