देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेतच संपूर्ण आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा वाजले आहेत. रुग्णांचे हाल होत असून आरोग्य यंत्रणेवर ताण पडताना दिसत आहे. तसेच ऑक्सिजन आणि वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा जाणवत आहे. करोनाबाधित अत्यवस्थ रुग्णांना रुग्णालयात बेड मिळणं कठीण झालं आहे. त्यातच गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी भारताला इशारा देत करोनाबाबत भाकीत वर्तवलं आहे. सीएनएन या वृत्तवाहिनेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अद्याप वाईट स्थिती येईल असं भाकीत केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘भारतात करोना स्थितीचा वाईट काळ येणं अजून बाकी आहे. भारताची करोनामुळे सध्या बिकट अवस्था आहे. अमेरिकेकडून भारताला मदत मिळत असल्याची चर्चा आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन भारतातील स्थितीवर लक्ष ठेवून आहेत.’, असं त्यांनी दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. ‘आमचं लक्ष लोकांना खरी आणि योग्य माहिती देण्यावर आहे. त्यामुळ लोकांना मदत मिळेल.’, असं त्यांनी गुगल कंपनी भारतासाठी काय करते? या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.

CORONA: कारण नसताना CT स्कॅन नको, नाही तर…

माहिती तंत्रज्ञान श्रेत्रातील आघाडीची कंपनी असणाऱ्या गुगलने भारतासाठी १३५ कोटींच्या मदतीची घोषणा केली आहे. गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी ही घोषणा केली आहे. दुसऱ्या लाटेत रुग्ण संख्या वाढत असल्याबद्दलही पिचाई यांनी चिंता व्यक्त केली आहे.

Corona Vaccine: सत्य तर जाणून घ्या, पुनावालांचं आवाहन

अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, सौदी अरेबिया यासारख्या अनेक देशांनी भारताला मदत करण्यासंदर्भातील आश्वासन दिलं आहे. मागील अनेक आठवड्यांपासून भारतामधील लस निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा करण्यासाठी अडवणूक करणाऱ्या अमेरेकिनेही भारतात सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. ब्रिटननेही भारताच्या करोनाविरुद्धच्या लढाईत सोबत असल्याचं आणि शक्य ती सर्व मदत करण्याचं आश्वासन भारतातील उच्चायुक्तांच्या माध्यमातून दिलं आहे. जगभरातील दहा लहान मोठ्या देशांनी भारताला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google ceo sundar pichai said that corona will make the situation worse in india rmt
First published on: 03-05-2021 at 20:19 IST