पीटीआय, वॉशिंग्टन

गोपी थोटाकुरा हे भारतीय वंशाचे उद्याोजक आणि वैमानिक हे अंतराळ पर्यटन करणारे पहिले भारतीय ठरणार आहेत. अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांच्या ‘ब्लू ओरिजिन’ या कंपनीतर्फे ‘एनएस-२५’ मोहमेवर पर्यटक म्हणून ते अंतराळाची सफर करणार आहेत. या मोहिमेसाठी एकूण सहा जणांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये थोटाकुरा यांचा समावेश आहे.

raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
“त्याला अशी शिक्षा…”, नेहाचा खून करणाऱ्या फयाजच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
sharad pawar
आघाडीत बिघाडी? मित्रपक्षाचं शरद पवारांना पत्र; प्रकाश आंबेडकरांचा उल्लेख करत म्हणाले, “काँग्रेसच्या चुकांचं पापक्षालन…”
DD news anchor faints during live news reading
Heatwave : उष्माघाताची बातमी देताना दूरदर्शनची अँकर स्टुडिओतच कोसळली, VIDEO व्हायरल

यामुळे थोटाकुरा हे पहिले भारतीय अंतराळ पर्यटक होणार आहेत, तसेच ते विंग कमांडर राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात जाणारे ते दुसरे भारतीय असतील. शर्मा हे १९८४मध्ये अंतराळात गेले होते. थोटाकुरा यांच्या अंतराळ सफरीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही असे ‘ब्लू ओरिजिन’तर्फे सांगण्यात आले. ‘ब्लू ओरिजिन’च्या ‘न्यू शेफर्ड’ कार्यक्रमाअंतर्गत मानवाने अंतराळात जाण्याची ही सातवी मोहीम आहे, तर एकूण इतिहासातील २५वी मोहीम आहे. आतापर्यंत एकूण ३१ मानवांनी पृथ्वीच्या वातावरणाबाहेर उड्डाण करून अंतराळात प्रवेश केला आहे.

हेही वाचा >>>VIDEO | आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींवर रोड शोदरम्यान दगडफेक, डोक्याला दुखापत; YSR आमदाराच्या डोळ्याला इजा

‘न्यू शेफर्ड’ हे ‘ब्लू ओरिजिन’द्वारे अंतराळ पर्यटनासाठी विकसित करण्यात आलेले, पूर्णत: पुन्हा वापरता येण्याजोगे उप-कक्षीय प्रक्षेपण वाहन आहे. या पर्यटन मोहिमेविषयी ‘ब्लू ओरिजिन’ने दिलेल्या माहितीनुसार, ‘‘गोपी हे एक वैमानिक आहेत आणि त्यांना वाहन चालवता येण्यापूर्वी विमान उडवता येऊ लागले होते’’. थोटाकुरा हे ‘प्रिझर्व्ह लाईफ कॉर्प’ या जागतिक केंद्राचे सहसंस्थापक आहेत. हार्ट्सफिल्ड-जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळावळ असलेले हे केंद्र व्यापक स्वास्थ्य आणि आरोग्याच्या क्षेत्रात सेवा प्रदान करते. गोपी थोटाकुरा हे व्यावसायिक उड्डाणाबरोबरच विविध प्रकारचे हौशी उड्डाणही करतात आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय वैद्याकीय वैमानिक म्हणूनही काम केले आहे.

गोपी यांचा जन्म आंध्र प्रदेशात झाला असून त्यांनी ‘एम्ब्री-रीडर एअरोनॉटिकल युनिव्हर्सिटी’मध्ये पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्याबरोबर मॅसन एंजेल, सिल्वेन कायरन, केनेथ एल. हेस, कॅरोल शॅलर आणि माजी हवाई दल कॅप्टन एड ड्वाइट हेही अंतराळ पर्यटनासाठी जाणार आहेत. या उड्डाणादरम्यान, प्रत्येक अंतराळ पर्यटक ‘ब्लू ओरिजिन’च्या संस्थापकाच्या वतीने पोस्टकार्ड घेऊन जातील.