अहमदाबादच्या नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ डिझाइनमध्ये शिक्षण घेतलेल्या शशांक निमकरने टाकाऊ सिरॅमिकपासून नव्या वस्तूंची निर्मिती करण्याचं तंत्रज्ञान विकसित केलं आहे. तसंच त्याचं पेटंटही त्यानं मिळवलं आहे. या नवकल्पनेला व्यापक रुप देण्यासाठी शशांकने अर्थ तत्त्व (Earth Tatva) ही स्वत:ची कंपनी देखील उभारली आहे. या कंपनीचा तो संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहे.

अनेकदा उद्योगांकडून खराब व त्रुटी राहिलेलं सिरॅमिक फेकून दिलं जातं. फेकून दिलेल्या या सिरॅमिकचं विघटन होत नाही. त्यामुळे पर्यावरणाशी संबंधित समस्या निर्माण होतात. यावर तोडगा म्हणून शशांकला सिरॅमिक पुनर्वापराची कल्पना सुचली. शैक्षणिक प्रकल्पाच्या निमित्ताने शशांकने घेतलेला हा पुढाकार आज पर्यावरण जतनासाठी महत्त्वाचा ठरत आहे.

‘गोष्ट असामान्यांची’ या लोकसत्ता लाइव्हच्या विशेष मालिकेतील आणखी व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक  करा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.