गर्भवती महिलांना बाळाच्या जन्माच्या आधीच्या सहा-सात महिन्यांसाठी उपचार, प्रवास व भोजनाचा खर्च केंद्र सरकारकडून मिळणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी शनिवारी श्रीनगर येथे ही योजना जाहीर केली.
गरोदर महिलांसाठी आठ वर्षांपूर्वी केंद्राने ‘इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना’ सुरू केली आहे. मात्र त्या योजनेनुसार केवळ बाळंतपणातच मातेला आर्थिक सहाय्य दिले जात होते. आता या योजनेचाच विस्तार करण्यात आला असून बाळाच्या जन्माच्या सहा ते सात महिने आधीपासूनच मातेला आर्थिक लाभ मिळणार
आहे.
या योजनेनुसार सरकारी रुग्णालयात बाळंतपणासाठी नाव नोंदविणाऱ्या गर्भवती महिलेला गर्भारपणाच्या काळात पूर्ण मोफत उपचार मिळतील. घर ते रुग्णालय आणि घर अशा प्रवासाचा खर्च मिळेल.  देशातील गरोदर महिलांना पैशाअभावी योग्य उपचार, तपासण्या, चौरस आहार आणि रुग्णालयात जाण्यायेण्यासाठीच्या प्रवासाचा खर्च करणे जड जाते. या खर्चाचा भार कमी व्हावा आणि जन्माला येणाऱ्या बाळाचे आरोग्यही चांगले असावे, यासाठी सरकारने ही योजना आखल्याचे आझाद यांनी सांगितले.
सरकारी रुग्णालयात बाळंतपणासाठी नाव नोंदविणाऱ्या गर्भवती महिलेला गर्भारपणाच्या काळात पूर्ण मोफत उपचार मिळतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government mother will do delivery
First published on: 23-06-2013 at 09:28 IST