वेगळ्या तेलंगणा राज्याच्या निर्मितीसंदर्भात कोणतीही अंतिम तारीख (डेडलाईन) ठरविण्यास केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नकार दिला. यासंदर्भात अद्याप चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
वेगळ्या तेलंगणाच्या निर्मितीसंदर्भात कोणती अंतिम तारीख ठरली आहे का, असे विचारल्यावर शिंदे यांनी यासंदर्भात विविध घटकांशी चर्चा सुरू असल्याचे सांगितले.
तेलंगणासंदर्भात गेल्या रविवारी केंद्र सरकार निर्णय जाहीर करण्याची शक्यता होती. मात्र, अजून विचारविनिमय आवश्यक असल्याचे सांगत सरकारने निर्णय पुढे ढकलला.
तेलंगणासंदर्भात महिन्याभरात निर्णय घेऊ, असे शिंदे यांनी गेल्या महिन्यात २८ तारखेला जाहीर केले होते.
संग्रहित लेख, दिनांक 30th Jan 2013 रोजी प्रकाशित
तेलंगणासंदर्भात डेडलाईन ठरविता येणार नाही : शिंदे
वेगळ्या तेलंगणा राज्याच्या निर्मितीसंदर्भात कोणतीही अंतिम तारीख ठरविण्यास केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नकार दिला. यासंदर्भात अद्याप चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
First published on: 30-01-2013 at 02:48 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government refuses to give fresh deadline on telangana