Congress MLA Nephew Kidnaped By Grandfather: मध्य प्रदेश काँग्रेसचे आमदार देवेंद्र पटेल यांच्या दोन वर्षांच्या पुतण्याचे अपहरण करून दीड किलो सोन्याची खंडणी मागितल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या तीन जणांमध्ये पीडित मुलाच्या आजोबाचाही समावेश आहे. याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे.

या प्रकरणातील पीडित मुलगा आमदार देवेंद्र पटेल यांचे बंधू योगेंद्र पटेल यांचा मुलगा आहे. गुरुवारी सकाळी रायसेन जिल्ह्यातील बेगमगंज तालुक्यातील पलोहा गावातून त्याचे अपहरण करण्यात आले होते. मात्र, त्याच रात्री उशिरा पलोहापासून सुमारे २०० किमी दूर असलेल्या छिंदवाडा जिल्ह्यातील तामिया शहरातून मुलाची सुटका करण्यात आली. रायसेनचे पोलीस अधीक्षक पंकज पांडे यांनी सांगितले की, मुख्य आरोपी अरविंद पटेल हा मुलाचा आजोबा आहे.

“आम्ही मुलाचा शोध घेण्यासाठी ११ पोलीस पथके तयार केली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे, आम्ही त्याचा तामियापर्यंत शोध घेतला. तेव्हा पीडित मुलगा अरविंद पटेल याच्या मित्राच्या घरात सापडला”, असे पोलीस अधिक्षक पंकज पांडे यांनी सांगितले.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अरविंद पटेलने त्याचा नातेवाईक राकेश पटेल आणि तिसऱ्या साथीदारासह अपहरणाचा कट रचला आणि खंडणी म्हणून १.५ किलो सोने मागितले. गुन्ह्यात वापरलेली व्हॅन आणि मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. याबाबत टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हा मुलगा बेपत्ता झाला. अपहरणाचा गुन्हा मानून पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी ड्रोन आणि स्निफर डॉगचा वापर करून मुलाला शोधले. दरम्यान काँग्रेसचे आमदार देवेंद्र पटेल हे रायसेन जिल्ह्यातील सिलवानी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.