दक्षिण गुजरातला सकाळी साडेनऊच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर सेक्लवर ४.७ इतकी मोजण्यात आली आहे. या भूकंपामुळे कोठेही जिवीतहानी किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
सुरतपासून १४ किमी अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भूकंपाचा धक्का जाणविल्याने नागरिकांनी घराबाहेर पळ काढला. मणिपूरलाही सकाळी आठच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसल्याचे वृत्त आहे. या भूकंपाची तीव्रता ३.२ इतकी होती.
#FLASH Tremors of magnitude 4.7 felt in various parts of South Gujarat at 9:24AM today. Epicentre at 14 kms from Surat.
आणखी वाचा— ANI (@ANI_news) July 17, 2016