पीटीआय, अहमदाबाद : गुजरातमध्ये पूर्वी झालेल्या जातीय दंगलींमध्ये समाजकंटकांचा सहभाग होता आणि काँग्रेसने ही सवय लागू दिली होती. मात्र, २००२ मध्ये दंगेखोरांना ‘धडा शिकवल्यानंतर’ गुन्हेगारांनी कारवाया थांबवल्या आणि भाजपने राज्यात ‘कायमस्वरूपी शांतता’ प्रस्थापित केली, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुजरातमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्त शहा यांनी खेडा जिल्ह्यातील महुधामध्ये प्रचारासाठी फेरी काढली. यावेळी ते म्हणाले की, गुजरातमध्ये काँग्रेसच्या कार्यकाळात (१९९५ पूर्वी) वारंवार जातीय दंगली झाल्या. काँग्रेस पक्ष विविध गट आणि जातींमधील लोकांना एकमेकांविरोधात उभे करत होता. काँग्रेसने दंगलींच्या माध्यमातून ‘व्होट बँक’ मजबूत केली होती. तसेच समाजातील एका मोठय़ा वर्गावर अन्याय केला होता, असा आरोपही शहा यांनी केला. फेब्रुवारी २००२ मध्ये गोध्रा रेल्वे जळितकांडानंतर गुजरातमध्ये मोठय़ा प्रमाणात हिंसाचार उसळला होता. २००४ ते २०१४ या काँग्रेसच्या १० वर्षांच्या कार्यकाळात १२ लाख कोटी रुपयांचे घोटाळे झाल्याचा दावा शहा यांनी केला. काँग्रेसवासियांनी त्यांची घरे पैशांनी भरली. गरीबी हटविण्याऐवजी त्यांनी गरिबांनाच हटविले, अशा शब्दांत शहा यांनी या सभेत तोफ डागली.

२००१ साली नरेंद्र मोदी (गुजरातमध्ये) सत्तेत आले आणि २००२नंतर कुठेही संचारबंदी लावण्याची गरज उरली नाही. सर्वजण जागेवर आले. आता कुठे माफिया आहेत? कुठे गुंड आहेत?

– अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujarat in violence social workers support congress amit shah statement in gujarat campaign rally ysh
First published on: 26-11-2022 at 02:31 IST