महाराष्ट्रात आणि देशात नरेंद्र मोदींना विरोध प्रचंड वाढतो आहे. लोकांना आता मोदी नको आहेत तर बदल हवा आहे. त्यामुळेच भाजपाकडून हिंदू-मुस्लिम वाद निर्माण केला जातो आहे असा आरोप शरद पवार यांनी केला आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं भाषण हे लाज वाटण्यासारखं होतं. एका समाजाबाबत ते इतकं वाईट बोलतात? त्यामुळे देशात विद्वेष वाढेल अशी स्थिती आहे असंही शरद पवार म्हणाले.

काय म्हणाले शरद पवार?

“छत्रपती शिवाजी महाराज हे वेगळे राजे होते. साडेतीनशे वर्षे उलटून गेली तरीही छत्रपती शिवराय लोकांच्या मनात घर करुन आहेत. त्यांनी जे राज्य केलं ते एका जातीचं किंवा जमातीचं नव्हतं. त्यांनी कधीही भोसलेंचं राज्य आहे असं म्हटलं नाही.” असं शरद पवार म्हणाले.

महागाईचा गंभीर प्रश्न

महागाईचा सर्वात मोठा प्रश्न नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात लोकांसमोर आहे. नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की सहा महिन्यात महागाई दूर करतो. मात्र परिस्थिती जैसे थे आहे. गॅस सिलिंडरची किंमत वाढली आहे. मोदींच्या कार्यकाळात महागाई कमी झाली नाही तर वाढली आहे. जगातल्या एका मोठ्या संख्येने बेकारी आणि बेरोजगारीचा अभ्यास केला त्यात ८६ टक्के तरुम बेरोजगार आहेत. मग मोदींची गॅरंटी आहे तरी काय? असा प्रश्नही शरद पवार यांनी विचारला.

हे पण वाचा- “पराभवच्या हताशेने शिवीगाळ…”, देवेंद्र फडणवीस यांचं शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना उत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपावाले हिंदू-मुस्लिम करु लागले आहेत कारण..

“बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला घटना दिली आहे. ही घटना सध्याच्या घडीला संकटा आहे. मोदी यांच्या जवळचे लोक म्हणतात पुन्हा सत्तेत आल्यास आम्हाला घटना बदलायची आहे. घटना बदलण्यासाठीच आम्हाला ४०० पार जायचं आहे. शिवाय काहीही झालं तरीही भाजपाचे लोक हिंदू मुस्लिम समाजाबाबत बोलू लागतात. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे भाषण केलं ते भाषण लाज वाटण्यासारखं होतं. पंतप्रधान पदी बसलेला माणूस एका समाजाबाबत इतकं वाईट कसं काय बोलू शकतो? मोदींच्या विरोधात रोष असल्यानेच हे सगळं चाललं आहे. ” असं शरद पवारांनी म्हटलं आहे. रायगडच्या सभेत त्यांनी मोदींवर ही टीका केली आहे.